Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयाबीनचे वायदे तातडीने सरु करा

सध्या देशातील बहुतांशी भागांमध्ये सोयाबीनची काढणी सुरु आहे. मात्र पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवण्याचं काम केलंय. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या तीनही राज्यांमध्ये सोयाबीन पिकाचं पावसामुळं मोठं नुकसान झालं.

अनिल जाधव

पुणे ः देशभरात मागील आठवडाभरापासून सतत पडणाऱ्या पावसामुळं सोयाबीनचं मोठं नुकसान (Soybean Crop Damage) होतंय. त्यातच सध्या सोयाबानचा बाजार (Soybean Market Rate) दबावात आहे. नव्या सोयाबीनला अगदी ४ हजार रुपयांपासून दर (Soybean Rate) मिळतोय. परिणामी शेतकरी अडचणीत आलेत. त्यामुळं सोयाबीनचे वायदे (Soybean Futurs) तातडीने सुरु करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

सध्या देशातील बहुतांशी भागांमध्ये सोयाबीनची काढणी सुरु आहे. मात्र पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवण्याचं काम केलंय. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या तीनही राज्यांमध्ये सोयाबीन पिकाचं पावसामुळं मोठं नुकसान झालं. त्यातच सध्या शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी दर मिळतोय. त्यामुळं सोयाबीन उत्पादकांना सध्या दुहेरी फटका बसतोय.

सध्या बाजारात नव्या सोयाबीनला देशभरात ४ हजारांपासून ते ४ हजार ७०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. तर जुन्या सोयाबीनचा दर ४ हजार ९०० ते ५ हजार २०० रुपयांपर्यंत आहेत. गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन रोखून धरल्यानं बाजारातील आवक मर्यादीत राहीली.

शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विकलं. मात्र यंदा वायदेबंद असल्यानं शेतकऱ्यांना भविष्यात किती दर मिळेल, याची माहिती मिळत नाही. वायदेबंदीचा शेतकऱ्यांना आता सर्वाधिक फटका बसतोय, असं वाशीम येथील परिवर्तन शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ढेकडे यांनी सांगितलं.

वायदे सुरु झाल्यास शेतकरी गरज आहे तेवढं सोयाबीन आता विकतील आणि चांगले दर मिळत असल्यास वायदे करतील. मात्र वायदेबंद असल्यानं दराची कोणतीही कल्पना येत नाही. व्यापारी स्थानिक पातळीवर दर पाडून सोयाबीन खरेदी करत आहेत. वायद्यांधून दराचा अंदाज तरी येतो.

त्यानुसार शेतकरी सोयाबीन द्यायचं की नाही याचा निर्णय घेत असतात. दरासाठी व्यापाऱ्यांशी वायद्यांचा दाखला देऊन भांडतही असतात. मात्र सध्या शेतकऱ्यांना दराची कोणतीही माहिती मिळत नाही. सोयाबीनचे वायदे तातडीनं सुरु करण्याची गरज असल्याचं भोपाळ येथील मध्य भारत शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष योगेश द्विवेदी यांनी सांगितलं.

पावसानं सोयाबीनचं नुकसान वाढलं. मात्र दर दबावातच आहेत. शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी थांबण्यास तयार आहेत. मात्र भविष्यात काय दर मिळेल, याची कोणतीही कल्पना नाही. वायदे सुरु झाल्यास किमान किती दर मिळू शकतो, याची माहिती तरी मिळेल.

यातून आधीच नुकसानीमुळं आतबट्ट्याचं ठरलेल्या सोयाबीनमधून काहीतरी हाती लागतं का? यासाठी शेतकऱ्यांना किमान प्रयत्नतरी करता येतील. त्यामुळं सरकारनं सोयाबीचे वायदे तातडीनं सुरु करावेत, अशी मागणी देशभरातील शेतकरी करत आहेत. आता सरकार शेतकऱ्यांच्या या मागणीला किती गांभीर्यानं घेत, हे पाहावं लागेल.

सध्या सोयाबीनचे दर पडले आहेत. नव्या सोयाबीनला ४ हजारांपासून दर मिळतोय. हा दर शेतकऱ्यांना परवडत नाही. मात्र भविष्यात काय दर राहतील, याचीही माहिती नाही. वायदे सुरु झाल्यास पुढील दोन, तीन महिन्यांत किती दर मिळेल याची शाश्वती दर राहील. त्यामुळं वायदे सुरु करण्याची गरज आहे.
ज्ञानेश्वर ढेकडे, अध्यक्ष, परिवर्तन शेतकरी उत्पादक कंपनी, वाशीम
वायद्यांमुळं शेतकऱ्यांकडे बाजाराचे पर्याय असतात. तसचं वायद्यांचा बाजाराला आधारही मिळत असतो. वायदे सुरु झाल्यास शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळण्यास मदत होईल. यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या सरकारच्या उद्दीष्टलाही हातभार मिळेल.
योगेश द्विवेदी, अध्यक्ष, मध्य भारत शेतकरी उत्पादक कंपनी, भोपाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT