Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : हिंगोलीत सोयाबीनच्या दरात किंचित चढ-उतार

Soybean Rate : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्यबाजारात दरात मागील काही आठवड्यांपासून किंचित चढ-उतार होत आहेत.

माणिक रासवे

Hingoli News : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्यबाजारात दरात मागील काही आठवड्यांपासून किंचित चढ-उतार होत आहेत. मंगळवारी (ता. ९) सोयाबीनची ६०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ४०५० ते कमाल ४४०० रुपये तर सरासरी ४२२५ रुपये दर मिळाले.

दरात फारशी सुधारणा होत नसल्याने येथील धान्य बाजारात सोयाबीनची आवक कमी-अधिक होत आहे. मागील आठवड्यामध्ये ६५५ ते १००० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. क्विंटल मागे १०० ते १५० रुपयांनी चढउतार होत आहेत.

दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवलेले आहे. परंतु अनेक आठवड्यापासून सोयाबीनचे कमाल दर साडेचार हजार रुपयापर्यंत तर किमान दर चार हजार रुपयापर्यंत असल्याने सोयाबीन उत्पादकांत निराशेचे वातावरण आहे.

दर साडेचार हजारांपुढे सरकेना

सोमवारी (ता.८) सोयाबीनची ८११ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४१४० ते कमाल ४५०० रुपये तर सरासरी ४३२० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.४) सोयाबीनची ५९९ क्विंटल आवक झाली.

त्यास प्रतिक्विंटल किमान ४००० ते कमाल ४४८१ रुपये तर सरासरी ४२४० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता.३) सोयाबीनची ६५५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४०५१ ते कमाल ४४८५ रुपये तर सरासरी ४२६८ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता.२) सोयाबीनची १००० क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल किमान ४१०५ ते कमाल ४५०० रुपये तर सरासरी ४३०२ रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT