Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : काढणीला येताच ‘सोयाबीन’चे दर कोसळले

मागील वर्षी सोयाबीनला चांगले दर होते. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला पसंती दिली. यातच अतिपावसाने उत्पादनात काहीशी झाली आहे.

टीम ॲग्रोवन

वावडे, जि.जळगाव ः मागील वर्षी सोयाबीनला चांगले दर (Soybean Rate) होते. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला (Soybean Sowing) पसंती दिली. यातच अतिपावसाने उत्पादनात (Soybean Production) काहीशी झाली आहे. सध्या सोयाबीन काढणी (Soybean Harvesting) सुरू असून, सोयाबीन शेतकऱ्यांच्या घऱात येताच व्यापाऱ्यांनी दर पाडले आहेत.

सध्या कमाल दर सा़डेचार हजार रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. मागील हंगामात दर सहा ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल होते. काही महिन्यांपूर्वीदेखील दर टिकून होते. पण सोयाबीनचे उत्पादन हाती येताच दर पाडल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ तर कधी बाजारपेठेत उत्पादन केलेल्या मालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी वारंवार अडचणीत येत आहेत. यावर्षी खरिपाच्या सुरुवातीला पेरणी योग्य पाऊस झाल्याने खरिपाची पेरणी वेळेत झाली.

सोयाबीन काढण्यासाठी तीन ते चार हजार रुपये एकरी मजुरी देऊन देखील मजूर मिळत नसल्याचे दिसते. सोयाबीन काढण्यासाठी शेतकऱ्याची चांगलीच दमछाक होत आहे.

आर्थिक संकट कायम

तीन महिन्यांपूर्वी सोयाबीन पेरणीच्या वेळी सोयाबीनला आठ हजार रुपयांपर्यंत भाव होता. परंतु सोयाबीन काढण्याची वेळ आली आणि भाव पडले. त्यामुळे आता मशागत आणि पेरणीसाठी झालेला खर्च देखील निघणार नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT