Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market: सोयाबीनचे भाव आजही हमीभावापेक्षा कमीच; शेतकरी तोट्यातच

Soybean MSP : देशातील बाजारात सोयाबीनची आवक मागील काही दिवसांपासून वाढत आहे. पण दुसरीकडे सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा कमीच आहेत.

अनिल जाधव

Pune News : देशातील बाजारात सोयाबीनची आवक मागील काही दिवसांपासून वाढत आहे. पण दुसरीकडे सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा कमीच आहेत. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीनचे भाव आणखी काही दिवस हमीभावाच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीनचा बाजार मागील तीन महिन्यांपासून पाच हजारांच्या खाली आला. एरवी ऑफ सिझन म्हणजेच ऑगस्ट- सप्टेंबरच्या दरम्यान दरात काहीशी तेजी पाहयला मिळते. हंगाम सुरु झाल्यानंतर भावपातळी कमी होते. पण यंदा मागील तीन महिन्यांपासून सोयाबीन बाजारात हंगामातील निचांकी पातळीवर आहे.

सोयाबीनने ५ हजारांचा टप्पा पार केला नाही. हंगाम सुरु झाल्यानंतर दर कमी होत गेले. सोयाबीनचे भाव ४ हजार २०० रुपयांपर्यंत कमी झाले होते. मालातील ओलावा काहीसा कमी झाल्यानंतर दरात क्विंटलमाग २०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली. सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

यंदा देशातील सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली. सोयाबीनची उत्पादकता एकरी ३० टक्क्यांपर्यंत कमी झाली. शेतकऱ्यांनी सांगितले की, एरवी सोयाबीनचा एकरी उतारा ८ ते ९ क्विंटल येत असतो.

पण काही भागात यंदा हाच उतारा ४ ते ५ क्विंटलपर्यंत खाली आला. तर भागात एकरी २ ते ३ क्विंटलने उत्पादन घटले. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीनही महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये यंदा पिकाला फटका बसला. यामुळे देशाचे उत्पादन कमीच राहण्याची शक्यता आहे.

खाद्यतेल आयातीचा दबाव

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव नरमलेले आहेत. म्हणजेच सोयापेंड आणि सोयातेलाचे भावही कमीच आहेत. या काळात सरकारने देशातील सोयाबीन उत्पादकांना संरक्षण देण्यासाठी खाद्यतेल आयात कमी करून भावाला आधार देणे आवश्यक होते.

पण आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेलाचे भाव कमी झाल्यानंतर सरकारने आयातशुल्क कमी करून खाद्यतेलाचे भाव पाडले. चालू हंगामात आतापर्यंत खाद्येतलाची आयात तब्बल २२ टक्क्यांनी वाढली. याचा दबाव सोयाबीनवर आलेला दिसतो. त्यामुळे सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात वाढ करावी, अशी मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT