Soybean Procurement  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Procurement : पंधरा वर्षांच्या तुलनेत सोयाबीनची १० पट जास्त खरेदी

Soybean Market : सोयाबीन खरेदी १० टक्के झाली आहे, असे विरोधक सांगत असले तरी गेल्या १५ वर्षांतील खरेदीपेक्षा १० पट जास्त खरेदी झाली आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला.

Team Agrowon

Mumbai News : सोयाबीन खरेदी १० टक्के झाली आहे, असे विरोधक सांगत असले तरी गेल्या १५ वर्षांतील खरेदीपेक्षा १० पट जास्त खरेदी झाली आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधांकावर टीका केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीत बेबनाव आहे. अनेक महत्त्वाचे नेते आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते. चर्चेची संधी असतानाही त्यांनी चहापानावर बहिष्कार घातला. त्यांनी दिलेले पत्र माध्यमांतील आलेल्या बातम्यांवर आधारित आहे. मात्र आम्ही दिलेले खुलासे वाचले असते तर बरे झाले असते.

विरोधकांनी हे प्रश्न सभागृहात मांडले तरी आम्ही त्याला उत्तर देऊ. अलीकडे स्थगितीच्या बातम्या येत आहेत. मात्र असे काही झाले आहे का हे माझ्या ऑफिसला विचारावे लागते. आमच्याकडे कोणत्याही आमदाराने निवेदन दिल्यानंतर त्यावर तपासून कार्यवाही करावी, असे लिहिले जाते. संबधित पक्षाच्या खात्यांशी संबंधित विषय असेल तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करेन. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना सोडले जाणार नाही.’’

फडणवीस म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या योजनांचा दबाव अर्थसंकल्पांवर असला तरी आम्ही आर्थिक शिस्त पाळू. कुठलीही योजना बंद पाडणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नियमाबाहेर आहेत त्यांनाच लाभ नाकारला आहे.’’ उपमुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनीही विरोधकांवर टीका केली.

पवारांनी धनंजय मुंडेंना टाळले

सह्याद्री अतिथिगृहात रविवारी (ता. २) मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या चहापान कार्यक्रमावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र पवार यांनी त्यांच्याकडे पाहिले नाही आणि बोललेही नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT