Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सोयाबीन खरेदीला चांदवड येथे प्रारंभ

Soybean Procurement : गेल्या तीन वर्षांपासून सर्वत्र सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने उत्पादकांना तोटा सहन करावा लागत होता.

Team Agrowon

Nashik News : येथे ''एनसीसीएफ''च्या माध्यमातून खरेदी-विक्री संघाच्या केंद्रावर सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीला प्रारंभ करण्यात आला आहे. खरेदी विक्री संघाचे चेअरमन ॲड.राजेंद्र ठाकरे, संचालक विजय कुंभार्डे, अनिल काळे, आनंदा बनकर, व्यवस्थापक लक्ष्मण सोनवणे, दत्तू नरोटे व शेतकरी आदी उपस्थित होते.

गेल्या तीन वर्षांपासून सर्वत्र सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने उत्पादकांना तोटा सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने सोयाबीनच्या हमीभाव खरेदीला मान्यता देऊन कार्यवाही केली आहे.

सोयाबीनची चार हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने खरेदी करण्यात येत आहे. चांदवड खरेदी विक्री केंद्रावर आतापर्यंत हमीभावाने खरेदी करण्यासाठी अंदाजे सातशे शेतकऱ्यांनी फॉर्म भरले आहेत. तर तीनशे ते सव्वातीनशे शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली. बुधवारी खरेदी केंद्रावर साधारण ५० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. विक्रीसाठी आणले होते.

जाचक अटी रद्द करण्याची मागणी

सोयाबीन खरेदीसाठी सरकारने ओटीपीची अट घातल्याने ऑनलाइन नोंदणीसाठी फार वेळ जात आहे. ऑनलाइन नोंदणी लवकर होत नाही. त्यामुळे ऑनलाइन नोंदणीसाठी ओटीपीची अट सरकारने रद्द करावी व एकरी पाच क्विंटल ऐवजी पंधरा क्विंटल सोयाबीन खरेदी करावी, अशी मागणी या वेळी उपस्थित सोयाबीन उत्पादक शेतकरी यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT