Soybean  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला मुदतवाढीची अपेक्षा

Soybean Market : राज्यात ३० जानेवारीपर्यंत नऊ लाख ४२ हजार टन सोयाबीनचे खरेदी करण्यात आली होती. मुदतीतील अखेरच्या दिवसापर्यंत साधारण दहा लाख टनांपर्यंत खरेदी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी देण्यात आलेली मुदतवाढ ३१ जानेवारी रोजी संपली. मात्र खरेदी केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्याने राज्य सरकारने सात फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची केलेली विनंती केंद्र सरकारने ३१ जानेवारीच्या सायंकाळपर्यंत मान्य केली नव्हती.

राज्यात ३० जानेवारीपर्यंत नऊ लाख ४२ हजार टन सोयाबीनचे खरेदी करण्यात आली होती. मुदतीतील अखेरच्या दिवसापर्यंत साधारण दहा लाख टनांपर्यंत खरेदी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मध्यंतरी बारदाना आणि अन्य कारणांमुळे सोयाबीन खरेदी रखडली होती.

परिणामी, खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्याने सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. यासाठी पणन विभागाने आधीच केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे मुदत वाढीचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र ३१ जानेवारीच्या सायंकाळपर्यंत मुदत वाढीची परवानगी देण्यात आली नव्हती.

राज्यातील ५६२ खरेदी केंद्रांवर ३० जानेवारीपर्यंत नऊ लाख ४२ हजार टन खरेदी करण्यात आली होती. यंदा राज्यात सोयाबीनच्या उत्पादनामध्ये चांगलीच वाढ झाल्याने खुल्या बाजारातील दर मोठ्या प्रमाणात पडले आहेत. परिणामी, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाप्रमाणे विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल होता. मात्र यंदा पाऊस चांगला झाल्याने सोयाबीनमध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त होते.

परिणामी, ‘नाफेड’च्या आणि ‘एनसीसीएफ’च्या नियमाप्रमाणे १२ टक्के ओलावा असेल तरच सोयाबीन खरेदी केले जात होते. मात्र या निकषांमध्ये बहुतांशी शेतकऱ्यांचे सोयाबीन बसत नसल्याने सोयाबीन खरेदीच होत नव्हती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने पंधरा टक्के ओलावा गृहीत धरून सोयाबीन खरेदी करावी, असे परिपत्रक काढले.

मात्र हे परिपत्रक केंद्रांपर्यंत पोहोचले नाही. परिणामी, त्याची अंमलबजावणी न झाल्याने सोयाबीन खरेदी रखडली होती. त्यानंतर राज्यामध्ये बारदान्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी आठ ते दहा दिवस सोयाबीन खरेदी थांबवावी लागली होती. १२ जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची अंतिम मुदत होती. ती वाढवून ३१ जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीला परवानगी देण्यात आली होती.

बारदाना, अन्य कारणांमुळे खरेदीची गती संथ

दरम्यानच्या काळामध्ये बारदाना आणि अन्य कारणांमुळे सोयाबीन खरेदी संथ गतीने सुरू असल्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी पणन विभागाने केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे केली होती. ३१ जानेवारीच्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत या मुदतवाढीची प्रतीक्षा होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT