Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीची घोषणा; मात्र प्रत्यक्ष खरेदी प्रक्रियेत त्रुटी

Soybean Market : काही तालुक्यात खरेदी चालू झाली आहे; परंतु तेथे अनेक अडचणी आहेत.या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी भारतीय किसान संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. शासनाने जो सोयाबीन खरेदीचा निर्णय घेतला तो स्वागतायोग्य आहे. पण प्रत्यक्षात त्या खरेदी प्रक्रियेत त्रुटी असल्यामुळे बऱ्याच तालुक्यात सोयाबीन खरेदीला सुरुवात झालेली नाही.

काही तालुक्यात खरेदी चालू झाली आहे; परंतु तेथे अनेक अडचणी आहेत.या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी भारतीय किसान संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भारतीय किसान सभेने शुक्रवारी (ता. १३) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन दिले. या वेळी नाफेडचे माजी संचालक नानासाहेब पाटील, सिन्नर फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे संस्थापक गणपतराव केदार, भारतीय किसान संघाचे अध्यक्ष रामदास पाटील, किसान संघाचे पणनमंत्री चंद्रकांत चव्हाण, जिल्हा मंत्री सूरज कोकणे आदी उपस्थित होते.

निवेदनातील मागण्यांनुसार सोयाबीन नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत होती, तरी अद्याप काही ठिकाणी खरेदी केंद्रे उघडलेली नाहीत. खरेदीतील अडथळे दूर करण्याची मागणी त्यांनी केली. अन्यथा, भारतीय किसान संघातर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. नैताळे जवळील खरेदी केंद्राकडे ११६७ शेतकऱ्यांनी कागदपत्रे जमा केली; मात्र प्रत्यक्षात नोंदणी फक्त ३०० शेतकऱ्यांची झाली आहे.

सॉफ्टवेअर व्यवस्थित काम करत नसल्याने लवकर नोंदी होत नसल्याच्या तक्रारी आहेत. याशिवाय दिवसातून दहा ते वीस नोंदी होत असल्याचे समोर आले आहे. याशिवाय वाहतूक खर्चासंदर्भात कुठलाही निर्णय नसल्याने खरेदी केंद्रात संभ्रम आहेत. यासह ‘एनसीसीएफ’चे क्यूआर कोड अजून उपलब्ध नाहीत, असे अनेक गोंधळ भारती किसान संघाने निवेदनाच्या माध्यमातून समोर आणले आहेत.

...या आहेत मागण्या

आर्द्रता १५ टक्के असेल तरी खरेदीचे दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे, त्यासंबंधीचा शासननिर्णय मिळावा.

नुकसान टाळण्यासाठी ग्रेडर खरेदी केंद्रावर उपलब्ध करावे

नोंदणी मुदतवाढ द्यावी,खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी

सोयाबीनमध्ये १५ टक्के डाळ असल्यास ते नाकारले जाते, त्याची मर्यादा वाढवावी. गुदाम परिसरात सुरक्षारक्षक नसल्याने उशीर झाल्यास वाहन परत आणावे लागते

खरेदी सुरू झाल्याची प्रसिद्धी सर्वत्र करावी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT