soybean rate  agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयाबीन दर तेजीतच

देशात सध्या सोयाबीनच्या दर वाढलेले आहेत. मात्र तरीही बाजारात आवक नाही. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारातही सोयाबीन दर सुधारलेले आहेत.

अनिल जाधव

पुणेः देशात सध्या सोयाबीनच्या दर (Soybean Rate) वाढलेले आहेत. मात्र तरीही बाजारात आवक नाही. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात (Soybean Market) बाजारातही सोयाबीन दर सुधारलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनाि सोयाबीन दरात आणखी वाढ होणयाची आशा आहे. सध्या देशातील बाजारात सोयाबीन सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ८०० रुपये दर मिळत आहे.

जगात ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटीना हे महत्वाचे सोयाबीन उत्पादक देश आहेत. यंदा ब्राझील आणि अर्जेंटीना या देशांमध्ये सोयाबीन उत्पादन विक्रमी पातळीवर पोचण्याचा अंदाज व्यक्त होतोय. त्यामुळं जागतिक सोयाबीन उत्पादनात ३४९ लाख टनांची वाढ होईल, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केला आहे.

युएसडीएच्या मते यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन ३ हजार ९०० लाख टनांवर पोचेल. मात्र यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत शिल्लक साठा कमी आहे. त्यामुळं सोयाबीनचा एकूण पुरवठा ४ हजार ८५२ लाख टनांवर होईल. तसंच यंदा जगात ३ हजार २९३ लाख टन सोयाबीनचं गाळप होण्याचा अंदाज आहे. तर जगात एकूण ३ हजार ८०२ लाख टन सोयाबीनचा वापर होणार आहे, असाही अंदाज युएसडीएनं व्यक्त केला आहे.

युएसडीएच्या मते यंदा ब्राझील आणि अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन वाढेल. मात्र या दोन्ही देशांमध्ये यंदा ला निना स्थितीचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळं उत्पादनाचे अंदाज चुकण्याची दाट शक्यता आहे. या दोन्ही देशांमध्ये सोयाबीनची पेरणी सुरु आहे. तर अमेरिका आणि भारतातील सोयाबीनचा हंगाम सुरु झाला. युएसडीनं अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन यंदा गेल्यावर्षीपेक्षा ३३ लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील हंगामात अमेरिकेत १ हजार २१५ लाख टन सोयाबीन उत्पादन झालं होतं. तर यंदा १ हजार १८२ लाख टनांवर उत्पादन स्थिरावण्याची शक्यता आहे.

ब्राझील आणि अर्जेंटीनातील पिकाबाबत लगेच काही सांगता येणार नाही. तसंच चीनची सोयाबीन खरेदी आता वाढली आहे. मात्र नेमकं अमेरिकेत सोयाबीन उत्पादन घटलं. त्यामुळं जागतिक बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात तेजी आली आहे. याचा फायदा भारतीय सोयाबीनलाही मिळतो आहे.

सध्या देशात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ८०० रुपये दर मिळतो आहे. सोयाबीनचे दर आणखी काही दिवस सरासरी किमान ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT