Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सोयाबीनच्या दरात दोनशे रुपयांनी घट

Soybean Rate : यंदाच्या हंगामात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून स्थिरावलेल्या सोयाबीनच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण झाली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : यंदाच्या हंगामात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून स्थिरावलेल्या सोयाबीनच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनचे दर ५३०० रुपयांपर्यंत गेले होते. त्यात आता घट आली असून सध्या ४६०० ते ४९०० रुपये दर मिळाले आहेत.

सोयाबीनला सध्या कमी दर मिळत आहे. सोयाबीनमधून शेतकऱ्यांना फारसे हाती काही लागले नाही. दरात थोडी वाढ दिसत होती. आणखी दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. गेल्या आठवड्यात क्विंटलमागे पाच हजार तीनशे रुपयांपर्यंत भाव मिळाला. त्यामुळे भावात आणखी वाढ होण्याची आशा होती. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिरावले होते. सरासरी पाच हजार रुपयांच्या पुढेच दर मिळत होता.

अचानक दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या हंगामातील सोयाबीनला पाच हजार रुपये इतका भाव मिळाला होता. हा दर काही दिवस स्थिर राहिला असून त्यानंतर पुन्हा दरात घसरण सुरू झाली. अवकाळीनंतर कापूस, तूर, भाजीपाला उत्पादकांना फटका बसला. त्यानंतर आता सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत येण्याची भीती आहे. शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकांना भाव नाही.

त्यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. यंदा सोयाबीनवर ‘यलो मोझॅक’चे आक्रमण झाले. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना फटका बसला. शेतकऱ्यांच्या हाती एकरी तीन ते चार तर काहींना दोन ते तीन क्विंटल सोयाबीन आले. उत्पादन खर्च निघेल एवढाही दर मिळेनासा झाला आहे. कापूस फारसा समाधानकारक झाला नाही. अतिवृष्टीमुळे कापसाचे नुकसान झाले. अशातच सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

सोयाबीन अजूनही घरात

शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेमुळे सोयाबीन घरातच साठवून ठेवले आहे. निसर्गाच्या लहरीपणानामुळे उत्पादनात घट झाली. हाती आलेले सोयाबीन विकून चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, आता दरात घसरण झाल्याने घरातच सोयाबीन साठवलेल्या शेतकऱ्यांपुढे सोयाबीन विकावे की नाही असा प्रश्‍न आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT