Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : खानदेशात कापूस खरेदी रखडत सुरू

Cotton Rate : खानदेशात कापूस दरात काहीशी सुधारणा मागील तीन-चार दिवसांत झाली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात कापूस दरात काहीशी सुधारणा मागील तीन-चार दिवसांत झाली आहे. परंतु खेडा किंवा थेट खरेदीला प्रतिसाद कमीच आहे. कमी उत्पादन व महागाई यामुळे शेतकरी दरांच्या प्रतीक्षेत आहेत.

शासकीय कापूस खरेदीची तयारीदेखील झाली आहे. या केंद्रांत कापूस विक्रीसंबंधी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे. पण या नोंदणीसही कमी प्रतिसाद आहे. कापसाचे उत्पादन अल्प आहे. कोरडवाहू कापूस एकरी ५० किलोच आला आहे. पूर्वहंगामी कापूस काही शेतकऱ्यांना पाच क्विंटल तर काहींना तीन क्विंटल एवढाच हाती आला आहे.

परिणामी, कापसाचा साठाच शेतकऱ्यांकडे कमी आहे. यात खर्च मात्र वाढला आहे. खते, मशागत, मजुरी या वरील खर्च वाढला आहे. यामुळे कापसाला चांगला दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

सध्या खानदेशात खेडा खरेदीत कापसाला ७३०० ते ७३५० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. खानदेशात कापसाची बाजार समित्यांत आवक होत नाही.

खेडा खरेदी किंवा थेट गावांत जाऊन खरेदी केली जाते. परंतु या खरेदीस दीपोत्सवाचा कालावधी संपल्यानंतरही यंदा प्रतिसाद कमी आहे. कापसाची आवक कमी असल्याने प्रक्रिया कारखान्यांचे काम ५० ते ६० टक्के क्षमतेने सुरू आहे.

सध्या खानदेशात रोज २२ ते २५ हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. मागील पंधरवड्यात ही आवक कमी होती. त्यात मागील दोन दिवसांत काहीशी वाढ झाली आहे. परंतु दरांत सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करणे टाळले आहे. काही शेतकरी आपल्याकडील अल्प कापसाची विक्री करीत आहेत. काहींनी निम्मा कापूस विक्री करून उर्वरित कापसाचा साठा आपल्याकडे ठेवला आहे.

आवक कमी

खानदेशात नंदुरबारातील शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर भागात कापसाची आवक बऱ्यापैकी आहे. परंतु इतर भागांत आवक कमी आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेर, बोदवड, पाचोरा भागात आवक होत आहे. परंतु जळगाव, यावल, चोपडा भागातील आवक कमी आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT