Cashew Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashew Market : सिंधुदुर्गात काजू बी खरेदीला प्रारंभ

Cashew Rate : जिल्ह्यात या वर्षीच्या काजू हंगामास प्रारंभ झाला असून, बांदा येथे काजू बी ला प्रतिकिलो १५० रुपये दर मिळाला आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात या वर्षीच्या काजू हंगामास प्रारंभ झाला असून, बांदा येथे काजू बी ला प्रतिकिलो १५० रुपये दर मिळाला आहे. तेथील शेतकरी नितीन मावळणकर यांनी प्रथम काजू विक्रीचा मान मिळविला आहे.

दर वर्षीच्या तुलनेत या वर्षी काजू हंगाम लांबला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत अजूनही काजूला मोहोर येत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी फळधारणा होत आहे. मात्र जिल्ह्यातील बांदा, दोडामार्ग या भागांमध्ये पहिल्या टप्प्यात आलेल्या काजू मोहराची बी परिपक्व होण्यास सुरुवात झाली आहे.

जिल्ह्याच्या उर्वरित भागाच्या तुलनेत या परिसरात महिना ते २५ दिवस अगोदर काजू हंगाम सुरू होतो. दरम्यान, बांदा येथील काजू उत्पादक नितीन मावळणकर यांनी या वर्षी सर्वांत पहिली काजू बी विक्री बांदा बाजारपेठेत केली आहे.

त्यांना प्रतिकिलो १५० रुपये दर मिळाला आहे. या वर्षी काजू बी ला चांगला दर राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. या वर्षी दिवाळी कालावधीत अनेक कारखानदारांकडे सिंधुदुर्गातील काजू बी उपलब्ध नव्हती.

त्या कालावधीत कारखानदारांनी अधिक दराने काजू बी खरेदी केली होती. काजूगराचे दरात देखील चांगली सुधारणा झाली होती. त्यामुळे यावर्षी काजू बीला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT