Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : अकोल्यात सोयाबीनच्या आवकेत मोठी वाढ

Soybean Rate : सोयाबीनचा किमान दर ३४०० तर कमाल ४६०० रुपयांपर्यंत आहे. तर, सोयाबीन सरासरी ४४०० रुपये दराने विकली जात आहे.

Team Agrowon

Akola News : सोयाबीन हंगामाला वेग आला असून बाजारपेठेतील आवकही वाढलेली आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या आठवड्यात साडेपाच हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक होत आहे. सोयाबीनचा किमान दर ३४०० तर कमाल ४६०० रुपयांपर्यंत आहे. तर, सोयाबीन सरासरी ४४०० रुपये दराने विकली जात आहे.

या महिन्यात दसऱ्याआधीपासूनच बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची काढणी सुरू झाली होती. बहुतांश सोयाबीन पावसाच्या तडाख्यात सापडले. उघडीप मिळताच शेतकरी सोयाबीनच्या सोंगणी, मळणीच्या कामाला लागलेे. आता पाऊस ओसरला असून सोयाबीन हंगामाने पुन्हा वेग धरला. एकीकडे शेतशिवारात सोयाबीन काढणीची लगबग सुरू आहे.

दुसरीकडे बाजारपेठांमध्ये आवकही दरदिवसाला वाढत आहे. शनिवारी (ता.२६) अकोल्यात सुमारे ६०३३ क्विंटल एवढी आवक झाली होती. पावसाचे वातावरण निवळल्याने आवक वाढत आहे. तसेच हंगामही शिगेवर पोहोचला आहे.

नवीन सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. तयार झालेला माल सुकवायला योग्य वातावरण मिळत नसल्याने अडथळे येत आहेत. अशा स्थितीत बरेच शेतकरी काहीसे ओलसर सोयाबीन विकून मोकळे होत आहेत. यामुळे किमान दर ३४०० पासून कमाल दर ४६०० रुपयांपर्यंत अकोला बाजार समितीत मिळत आहे.

दर्जेदार सोयाबीन साडेचार हजारांवर विकले जात आहे. कमाल दर मात्र काही क्विंटल मालालाच मिळाला. सरासरी ४४०० रुपये दरात अधिक मालाची विक्री झाल्याचे बाजार समितीकडून स्पष्ट करण्यात आले. आता सोयाबीन काढणीला वेग आल्याने येत्या काही दिवसांत अधिक प्रमाणात आवकही वाढू शकेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT