Bedana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Market : जून महिन्यात १० हजार टन बेदाण्याची विक्री

Bedana Rate : राज्यात मे महिन्याअखेर ९५ हजार टन बेदाण्याची विक्री झाली होती. मुळात, मे महिन्यात लग्न समारंभ असतात. त्यामुळे बेदाण्याची मागणी वाढते.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : तासगाव, सांगली, पंढरपूर या बेदाणाच्या बाजारपेठांत सौद्याला अंदाजे १० हजार टन बेदाण्याची आवक होत असून ५० टक्के विक्री होत आहे. सध्या सण-उत्सव नसल्याने बाजारपेठेत बेदाण्याची आवक मंदावली असल्याने उठावही कमी झाला आहे. दर टिकून आहेत. बेदाण्याला प्रतिकिलोस ११० ते २२० रुपयांपर्यंत दर आहेत. सध्या दरात चढ- उतार होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

राज्यात मे महिन्याअखेर ९५ हजार टन बेदाण्याची विक्री झाली होती. मुळात, मे महिन्यात लग्न समारंभ असतात. त्यामुळे बेदाण्याची मागणी वाढते. परंतु यंदा फारसे लग्न समारंभ नव्हते. त्यामुळे मे महिन्यात त्याचा अपेक्षित उठाव झाला नाही. तरीही बेदाण्याला मागणी बरी असल्याने दरही टिकून होते. सांगली, तासगाव आणि पंढरपूर या तीन प्रमुख बेदाणा बाजारांत अंदाजे एक हजार टन सौद्यासाठी आवक होते.

जूनमध्ये बेदाण्याची मागणी कमी आहे. त्यामुळे आवक मंदावली आहे. मे महिन्यापेक्षा जून महिन्यात सौद्याला सुमारे ५०० टनांनी आवक कमी झाली असल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. मे महिन्यात बेदाण्याची १३ हजार टनाची विक्री झाली होती. जूनमध्ये सुमारे बेदाणा १० हजार टन विकला गेला आहे.

मुळात बाजारात बेदाण्याची आवक मंदावली असली तरी, बेदाण्याचे दर टिकून आहेत. सध्या राज्यातील शीतगृहात १ लाख १० हजार टन बेदाणा शिल्लक आहे. शेतकरी बेदाण्याच्या दराची स्थिती पाहून विक्री करत आहेत. हिरव्या बेदाण्याला ११० ते २२० रुपये प्रति किलो, पिवळ्या बेदाण्याला १०० ते १६० रुपये प्रतिकिलो दर आहे.

जुलैच्या पंधरवड्यापर्यंत बेदाण्याची आवक आणि मागणी कमी-अधिक राहण्याची शक्यता आहे. ऑगस्ट, सप्टेंबरपासून उत्सव, सण सुरू होत आहेत. त्यामुळे जुलैच्या मध्यापासून बेदाणा खरेदीसाठी व्यापारी पुढे येतील. या दरम्यान आवक वाढेल आणि उठावही चांगला होईल, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरही वाढतील, असा अंदाज काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

यंदाच्या हंगामात बेदाण्याचे दर टिकून राहिले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत मागणीनुसार बेदाण्याची आवक सुरू आहे. येत्या महिन्यात बेदाण्याची विक्री वाढेल.
- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

Marigold Farming: तीन हंगामांत झेंडूचे हुशारीने नियोजन

Agriculture Success Story: कुक्कुटपालन पूरक नव्हे, झाला मुख्य व्यवसाय

Sugarcane Farmer Issues: कष्ट शेतकऱ्यांचे, नफा इतरांचा

India Sugar Crisis: आकडे आणि नामुष्की

SCROLL FOR NEXT