Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market Rate : हिंगोली बाजार समितीत तुरीच्या दरात सुधारणा

Tur Bazarbhav : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात (भुसार मार्केट) तुरीच्या दरात सुधारणा सुरू आहे.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात (भुसार मार्केट) तुरीच्या दरात सुधारणा सुरू आहे. कमाल दर दहा हजार रुपयापर्यंत वधारले आहेत. किमान दर नऊ हजारांवर आहेत.

हिंगोली धान्य बाजारात शनिवारी (ता. ३) तुरीची ३०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ९५०० ते कमाल १०००० रुपये तर सरासरी ९७५० रुपये दर मिळाले.

हिंगोली जिल्ह्यात गतवर्षीच्या (२०२२) खरीप हंगामात अतिववृष्टीमुळे बुरशीजन्य रोगाचा प्राद्रुर्भाव झाल्यामुळे तुरीच्या उतपादकतेत घट झाली आहे.

त्यामुळे धान्य बाजारात तुलनेत निम्म्याहून कमी आवक आहे. त्यामुळे एक दिवसआड आवक घेतली जात आहे. स्थानिक परिरातून तुरीची आवक होत आहे. सध्या एक दिवसाआड २०० ते ३०० क्विंटल आवक आहे.

गुरुवारी (ता. १) तुरीची ३०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ९००० ते कमाल ९६५५ रुपये तर सरासरी ९३२७ रुपये दर मिळाले.

मंगळवारी (ता. ३०) तुरीची १०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ९१९९ ते कमाल ९६९५ रुपये तर सरासरी ९४४७ रुपये दर मिळाले. खुल्या बाजारातील किरकोळ व्यापारी (फडीधारक) देखील दहा हजार रुपयांच्या आसपास खरेदी करत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT