Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Production: कापूस उत्पादन ३०४ लाख गाठींवर 'सीएआय'चा सुधारित अंदाज जाहीर; आयात वाढली!

Cotton Update: देशातील कापूस उत्पादनाच्या अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘सीएआय’ने २ लाख गाठींची वाढ केली. यंदाचे उत्पादन ३०४ लाख गाठी आहे. चालू हंगामाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये देशातून कापूस निर्यात केवळ ७ लाख गाठी झाली.

Team Agrowon

Pune News: देशातील कापूस उत्पादनाच्या अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘सीएआय’ने २ लाख गाठींची वाढ केली. यंदाचे उत्पादन ३०४ लाख गाठी आहे. चालू हंगामाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये देशातून कापूस निर्यात केवळ ७ लाख गाठी झाली. तर आयात १२ लाख गाठींवर पोहोचल्याचेही ‘सीएआय’ने म्हटले आहे. हंगामातील उत्पादनाचे अंदाज वाढवले तरी वापर, आयात-निर्यातीचा अंदाज कायम ठेवण्यात आला.

कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘सीएआय’ने नुकतीच आपल्या सर्व राज्यातील भागधारकांची बैठक घेतली. या बैठकीत उत्पादन, वापर, आयात आणि निर्यातीची चर्चा करण्यात आली. आतापर्यंत बाजारात दाखल झालेल्या कापसावरून तेलंगणाच्या उत्पादनात तब्बल ६ लाख गाठींनी वाढ झाल्याचे सीएआयने म्हटले आहे.

तेलंगणात यंदा ४२ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज आहे. तर उत्तर भारतातील पंजाब, हरियाना आणि राजस्थानमधील उत्पादनात ३.५ लाख गाठींची कपात करण्यात आली. तसेच इतर राज्यांतील उत्पादनात काहीशी वाढ-कपातीसह देशातील उत्पादनाचा अंदाज २ लाख गाठींनी वाढविण्यात आला. देशातील उत्पादनाचा अंदाज पूर्वीच्या ३०२ लाख गाठींवरून ३०४ लाख गाठी करण्यात आला.

भारतात यंदा कापसाची आयात वाढण्याचा अंदाज हंगामाच्या सुरुवातीपासूनच व्यक्त करण्यात आला. गेल्या हंगामात भारताने कापसाची निर्यात जास्त केली होती तर आयात कमी केली होती. गेल्या हंगामात भारताने २८ लाख गाठी कापूस निर्यात केली होती. तर आयात १५ लाख गाठी होती. पण यंदा आयात जास्त होण्याचा अंदाज आहे. भारत यंदा २५ लाख गाठी आयात करेल आणि १८ लाख गाठी निर्यात करेल, असा अंदाज ‘सीएआय’ने व्यक्त केला.

आयात-निर्यात

‘सीएआय’ने देशातील आयात आणि निर्यातीचा डिसेंबरपर्यंतचा आकडा जाहीर केला. भारतात चालू हंगामाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात १२ लाख गाठी कापूस आयात झाला. तर ७ लाख गाठी कापसाची निर्यात झाली. म्हणजेच यंदा निर्यातीपेक्षा आयात जास्त आहे.

बाजारातील आयात

देशातील बाजारात आतापर्यंत जवळपास ५८ टक्के कापूस शेतकऱ्यांनी विकल्याचे दिसते. देशातील बाजारात आतापर्यंत १७८ लाख गाठीच्या दरम्यान कापूस आला. देशातील बाजारात सध्या रोज दीड लाख गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होत आहे.

देशातील बाजारभाव

देशातील बाजारभाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. बाजारातील आवक आणि मर्यादित उठाव यामुळे दरावर दबाव आला आहे. सध्या कापूस ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. त्यामुळे कापसाच्या भावातही काहीसे चढ उतार येऊ शकतात, असेही अभ्यासकांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT