Kolhapur News : देशात अंतिम टप्प्यात साखर उत्पादन वाढत असल्याने केंद्राने इथेनॉल निर्मितीवरील बंधने शिथिल करावीत, अशी मागणी साखर उद्योगांतून निरंतर होत आहे. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) यंदा अंतिम टप्प्यात साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे.
यानंतर ‘इस्मा’ने सार्वजनिक वितरण विभागाला या बाबतचे पत्र दिले आहे. केंद्राने बी हेवी मोलॅसिस, साखर व उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला परवानगी दिली आहे. या पत्रामध्ये कोणत्या भागात किती उत्पादन होईल. या बाबत विभागाला माहिती दिली आहे. ‘इस्मा’ने हंगामाच्या पूर्वी ३३० लाख टन साखर तयार होईल, असा अंदाज व्यक्त केला होता, पण हंगामाच्या शेवटी शेवटी हा अंदाज ३४० लाख टन साखरेपर्यंत अंदाज वाढविला.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये यंदा अंदाजापेक्षा अधिक उत्पादन होत असल्याने साखर उत्पादन यंदा चांगले होईल, असे ‘इस्मा’ने पत्रात म्हंटले आहे. केंद्राच्या प्रोत्साहनामुळे नवीन सुरू झालेल्या इथेनॉल प्रकल्पांना संकटातून बाहेर काढण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे.
डिसेंबरमध्ये इथेनॉलसाठी उसाचा रस, बी हेवी मोलॅसिसचा वापर बंद करण्याचा आदेश देऊन या प्रकल्पांची कोंडी केली. यामुळे या प्रकल्पातून होणारी इथेनॉल निर्मिती मोठ्या प्रमाणात घटली आहे.
खरे तर इथेनॉल निर्मिती बी हेवी मोलॅसिसपासूनच जास्त होते. आणि त्याच्या वापरावरच निर्बंध घातले. १७ लाख टन साखरेपासून इथेनॉल तयार करण्याच्या सूचना दिल्या. आता सुधारित अंदाजानुसार १० लाख टन साखर अतिरिक्त मिळू शकेल याचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी होऊ शकतो.
यामुळे केंद्राने इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध कमी करावेत, असे आवाहन केले आहे. निर्बंध उठविल्यास ३२ ते ३३ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होऊ शकते, असा विश्वास ‘इस्मा’ने केंद्रीय सार्वजनिक वितरण विभागाला दिला आहे.
सद्यःस्थितीत साखर उत्पादन गतवर्षीऐवढेच
देशातील २०८ साखर कारखाने १५ मार्च २०२३ अखेर बंद झाले होते. यंदा या कालावधीत १६२ साखर कारखाने बंद झाले आहेत. यंदा या कालावधीत २८० लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २८२ लाख टन साखर निर्मिती झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ २ लाख टन साखर कमी तयार झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या बरोबरीने साखर उत्पादन सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात जवळ जवळ सारखी परिस्थिती आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.