Chana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Procurement : ‘नाफेड’मार्फत हरभऱ्याच्या खरेदीसाठी सोमवारपासून नोंदणी

‘नाफेड’मार्फत हरभरा खरेदीसाठी सोमवार (ता. २७) पासून पणन महासंघ शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करणार आहे.

Team Agrowon

Chana Market Update मुंबई : ‘नाफेड’मार्फत (NAFED) हरभरा खरेदीसाठी (Chana Procurement) सोमवार (ता. २७) पासून पणन महासंघ शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करणार आहे. पणन महासंघाने केंद्र सरकारला गुरुवारी (ता.१६) हमी भावाप्रमाणे (Chana MSP) हरभरा खरेदीसाठी पत्र लिहिले होते.

मात्र अद्याप केंद्र सरकारने परवानगी दिलेली नाही. तरीही खरेदीस परवानगी मिळेल, या अंदाजानुसार महासंघाने नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने यंदा हरभऱ्यासाठी पाच हजार ३३५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. तर सध्या बाजारात साडेचार हजार ते ४ हजार ९०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ‘नाफेड’मार्फत हरभरा खरेदी करण्याची मागणी होत आहे.

कृषी विभागाच्या चौथ्या पाहणी अहवालानुसार, राज्यात ३६.३९ लाख मेट्रिक टन उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

त्यापैकी २५ टक्के म्हणजे ९.०९ लाख मेट्रिक टन हरभरा खरेदीस मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मागील वर्षी पहिल्या टप्प्यात ६. ८९ लाख मेट्रिक टन हरभरा ‘नाफेड’मार्फत खरेदी केला होता.

यापैकी सहा लाख टन नाफेड, तर ८९ हजार टन ‘एफसीआय’ला उद्दिष्ट देण्यात आले होते. मुदतीपूर्वीच हे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा हरभरा पडून होता. त्यानंतर वाढीव उद्दिष्ट देण्यात आले होते.

केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा

महाराष्ट्रात २८ लाख ३० हजार हेक्टरवर हरभरा लागवड झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत २. ५ लाख हेक्टरने हे क्षेत्र वाढल्याने उत्पादनातही वाढ झाली आहे.

परिणामी दरात समतोल राहण्यासाठी ‘नाफेड’मार्फत हरभरा खरेदी करावी, अशी शेतकरी मागणी करीत होते.

येत्या दोन दिवसांत केंद्र सरकार खरेदीस परवानगी देईल. त्यानंतर खरेदी केंद्रे सुरू होतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT