Hapus Mango  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Hapus Mango Rate : वाशी बाजारात विक्रमी हापूसची आवक ; जानेवारीत तब्बल ३६० पेट्या दाखल

Hapus Mango Arrival In Vashi Market : यंदाच्या हंगामातील हापूस आंबा बाजारात दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. वाशी बाजार समितीमध्ये जानेवारी महिन्यात हापूसची विक्रमी आवक झाली आहे.

Mahesh Gaikwad

Pune News : यंदाच्या हंगामातील हापूस आंबा बाजारात दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. वाशी बाजार समितीमध्ये जानेवारी महिन्यात हापूसची विक्रमी आवक झाली आहे. यावर्षी जानेवारीत बाजार समितीमध्ये विक्रमी ३६० पेट्यांची आवक झाली आहे. प्रतवारीनुसार या आंब्याला प्रतिपेटी सात हजार ते १२ हजारांचा दर मिळत आहे.

कोकणातील हापूस वाशी बाजारात दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. अद्याप आंबा हंगामाला पूर्णपणे सुरूवात झालेली नाही. दरवर्षी जानेवारी महिन्यात हापूसची २५ ते ३० पेट्यांची आवक होत असते. मात्र, यंदा जानेवारी महिन्यात वाशी बाजारात हापूसच्या विक्रमी ३६० पेट्यांची आवक झाली आहे. या आंब्याला दरही चांगला मिळत आहे.

अवकाळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी आंब्याचा मोहराची गळ झाली होता. तसेच बुरशीजन्य रोग आणि रसशोषक कीडींचाही प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले. पावसामुळे मोहर गळ झाल्याने पुनर्मोहराची प्रकिया लांबली. परिणामी फळ तयार होण्याच्या प्रक्रियेलाही उशीर झाला. परंतु काही भागात अवकाळीचा फटका बसूनही योग्य व्यवस्थापनामुळे फळ वेळेत तयार झाले आहे.

मागील वर्षी आंब्याचे उत्पादन घटले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात आंब्याचे चांगल्या प्रमाणत उत्पादन राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांना होता. मात्र, मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे एप्रिलमध्ये येणाऱ्या आंब्याचा मोहर काळा पडला. याशिवाय रसशोषक कीडीचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे एप्रिलच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

दरम्यान, जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात हापूसची आवक झाली आहे. ही आवक इतिहासातील सर्वोच्च अशी विक्रमी आवक असल्याचे व्यापारी सांगत आहेत. बाजारत दाखल झालेल्या ३६० पेट्यांपैकी देवगडमधून सर्वाधिक २५० पेट्यांची आवक झाली आहे. तर, रत्नागिरीतून ८० आणि बाणकोटमधून ८० बॉक्सची आवक झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT