Vegetable Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Vegetable Rate : सर्वच भाजीपाल्याचे दर स्थिर

पुणे बाजार समितीची स्थिती; पितृपंधरवडा संपत आला असला तरी भेंडी, गवार, तांबडा भोपळा मागणीत वाढ

टीम ॲग्रोवन

पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती (Pune APMC) मध्ये रविवारी (ता. २५) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक भाजीपाल्याची आवक (Vegetable Arrival) झाली होती. पितृपंधरवडा संपत आला असला तरी भेंडी, गवार, तांबडा भोपळा आणि पालेभाज्यांच्या मागणीत (Vegetable Demand) वाढ झाल्याने दर वाढलेले होते. तर बहुतांश सर्वच भाजीपाल्याचे दर (Vegetable Rate) स्थिर होते.

परराज्यांतून झालेल्या भाजीपाल्याच्या आवकेमध्ये गुजरात आणि कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे ७ टेम्पो, कर्नाटक येऊन ३ टेम्पो घेवडा, गुजरात येथून भुईमूग ५ टेम्पो, इंदूर येथून गाजर ५ टेम्पो, तर आंध्र प्रदेशातून ३ टेम्पो शेवग्याची तर आग्रा इंदूर येथून बटाटा ४० ट्रक आणि गुजरातमधून लसणाची १३ ट्रक आवक झाली होती.

तर राज्याच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे दीड हजार पोती, टोमॅटो सुमारे ८ हजार क्रेट, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी १०, तर भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ टेम्पो, मटार सुमारे ४० गोणी आवक झाली होती. तर कांदा ५० तर स्थानिक तळेगाव बटाटा सुमारे ५०० गोणी आवक झाली होती. तर नवरात्री निमित्त मलकापूर भागातून गावरान रताळ्याची सुमारे १ हजार गोणी आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :

कांदा : १००-१५०, बटाटा : परराज्य १८०-२२०, स्थानिक २४०-२६०, लसूण : १००-४००, आले सातारी : १००-३५०, भेंडी : ४००-५००, गवार : गावरान ५००-७००, टोमॅटो : १६०-२२०, दोडका : ४५०-५००, हिरवी मिरची : ३५०-५००, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २००-२५०, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी ४००-४५० पांढरी - ३५०-४००, पापडी : ४५०-५००, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : २००-३००, कोबी : १५०-१८०, वांगी : ३००-४००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : ३००-५००, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : २००-२२०, शेवगा : ६००-८००, गाजर : ३००-३५०, वालवर : ४००-४५०, बीट : १८०-२००, घेवडा : ८००-९००, कोहळा : १००-१५०, घोसावळे : ३००-३५०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग शेंग : ५००, मटार : १४००-१५०० पावटा : ४५०-५००, तांबडा भोपळा : ६०-१००, कैरी तोतापुरी - १०००-१२०० रताळी ३५०-४००, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६०००.

पालेभाज्या तेजीत

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची दीड लाख, तर मेथीची ६० हजार जुड्या आवक झाली होती.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १५००-३५००, मेथी : १०००-१८००, शेपू : ४००-८००, कांदापात : १०००-१८००, चाकवत : ६००-८००, करडई : ४००-७००, पुदीना : ३००-८००, अंबाडी : ४००-७००, मुळे : १०००-१६००, राजगिरा : ४००-७००, चुका : ८००-१२००, चवळई : ४००-६००, पालक : ८००-१६००.

फळबाजार

फळ बाजारात रविवारी (ता.२५) लिंबाची सुमारे दीड हजार गोणी आवक झाली होती. तर डाळिंब सुमारे ३० टन, मोसंबी सुमारे ७० टन, संत्रा २० टन, पपई ५ टेम्पो, सीताफळ २० टन, पेरू ५०० क्रेट्‍स कलिंगड ४, तर खरबूज २ टेम्पो आवक झाली होती.

विविध फळांचे दर पुढीलप्रमाणे

लिंबे (गोणीस) - ६००-८००, डाळिंब (किलो) गणेश - १०-४०, भगवा ४०-१६०, आरक्ता १०-६०, पपई प्रति किलो -१५-१८, पेरू (२० किलो) -४००-६००, सिताफळ - २०-१२०, कलिंगड १२-२० खरबूज ३०-४०, मोसंबी ३ डझन १००-२६०, ४ डझन ४०-१२०. संत्रा (१० किलो) ३००-७००.

फुलबाजार

नवरात्रीमुळे विविध फुलांना मागणी वाढली आहे. मात्र सततच्या पावसामुळे चांगल्या फुलांची आवक कमी असल्याने दर्जेदार फुलांना मागणी वाढल्याने दर वाढले आहेत.

फुलांचे प्रति किलोचे दर

झेंडू - १०-७०, गुलछडी ३००-५००, बिजली ५०-१२०, कापरी ३०-८०, शेवंती ७०-१८०, ॲस्टर (चार गड्ड्यांचे दर) २०-३०, गुलाब गड्डी (१२ फुलांची) २०-४०, गुलछडी काडी २०-६०, डच गुलाब (२० नग) ६०-१५०, जरबेरा ३०-६० कार्नेशन ८०-१००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Food Processing Industry : ‘माऊली’ ब्रॅंड उत्पादनांचा होतोय विस्तार

Mango Orchard Management : आंबा मोहोरताना घ्यावयाची काळजी

Postal Votes : पोस्टल मतांनी पटोलेंना तारले

Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

SCROLL FOR NEXT