Papaya Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Papaya Market : खानदेशात पपई आठ रुपये किलो

Papaya Rate in Khandesh : खानदेशात पपई दराचा तिढा दर महिन्याला तयार होत असतानाच सध्या आठ रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना जागेवर किंवा शिवार खरेदीत मिळत आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात पपई दराचा तिढा दर महिन्याला तयार होत असतानाच सध्या आठ रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना जागेवर किंवा शिवार खरेदीत मिळत आहे. शेतकऱ्यांना कमी दर दिले जात असून, नऊ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर किंवा शिवार खरेदीत मिळावा, अशी मागणी केली जात आहे.

पपईची काढणी ऑक्टोबरपासून सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे पाच चार हजार ५०० हेक्टरवर पपई आहे. त्यात शहादा तालुक्यात साडेचार हजार हेक्टर एवढे पपईचे क्षेत्र आहे. पपईची लागवड धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील यावल, चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर भागातही झाली आहे. दर महिन्यागणिक कमी झाले आहेत. सुरुवातीला शिवार खरेदीत किंवा थेट जागेवर ३० ते ३५ रुपये प्रतिकलोचे दर मिळाले.

नंतर २५ ते ३० रुपये, नोव्हेंबरमध्ये सरासरी २० रुपये प्रतिकिलोचा दर होता. नोव्हेंबरच्या अखेरीस १० ते १२ रुपये दर होता. या महिन्यात आठ रुपये एक पैसा ते आठ रुपये १० पैसे दर मिळत आहे. उत्पादन खर्चानुसार हा दर परवडत नसल्याची स्थिती आहे. कारण पपईला जेवढा खर्च लागला, तेवढे दर नाहीत, असे चित्र आहे.

सध्या किमान नऊ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर मिळावा. यासंबंधी मध्यंतरी शहादा, शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करून पपई काढणीस विरोध केला होता. खरेदीदार धुळे, नंदुरबार, राजस्थान, दिल्ली या भागांतील आहेत.

शहादा, शिरपूर येथेही अनेक एजंट आहेत. ही मंडळी पपई नाशिवंत असल्याचा व शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेतात आणि दर कमी करतात, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

यासंबंधी शहादा, शिरपूर, चोपडा येथील बाजार समिती, संबंधित सहायक निबंधक यांनी एक बैठक घ्यावी. शेतकरी, व्यापारी, एजंट यांना या बैठकीस बोलवावे व चर्चा करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT