Raisin Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Raisin Market : बेदाणा बाजारात येण्याचा मुहूर्त लांबणीवर

Raisins Update : अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागेला फटका बसला. परिणामी घड जिरणे, गळकूज यामुळे द्राक्षाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे बेदाणा तयार करण्यासाठी द्राक्ष उशिरा येणार आहेत.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागेला फटका बसला. परिणामी घड जिरणे, गळकूज यामुळे द्राक्षाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे बेदाणा तयार करण्यासाठी द्राक्ष उशिरा येणार आहेत. परिणामी यंदाच्या हंगामातील बेदाणा निर्मिती तब्बल एक महिना लांबणीवर पडण्याची शक्यता बेदाणा शेड मालकांनी व्यक्त केली आहे.

सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील नागज आणि जुनोणी या भागात बेदाणा निर्मिती केली जाते. या दोन्ही भागात सुमारे ७ हजारांहून अधिक बेदाणा निर्मितीची शेड आहेत. या भागात कोरडे वातावरण असल्याने दर्जेदार बेदाणा तयार होतो. गतवर्षी पावसाने दडी मारली. त्यामुळे छाटणी लांबणीवर पडल्या होत्या. त्यातच अवकाळी पावसामुळे फुलोरावस्थेत असलेल्या बागांचे नुकसान झाले होते. त्यामुळे हंगाम पंधरा दिवस लांबणीवर पडला होता.

बेदाणा निर्मितीचा हंगाम जानेवारी महिन्याच्या मध्यापासून सुरुवात होते. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून शेड दुरुस्तीची कामे सुरू होतात. त्यासाठी परराज्यातून मजूरही त्याच दरम्यान शेडवर दाखल होतात. फेब्रुवारीच्या मध्यापासून बेदाणा निर्मितीला गती येते. मात्र, यंदा एप्रिल मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मॉन्सून वेळेत दाखल झाला. परिणामी फळ छाटणीला काही अंशी या पावसामुळे अडथळे निर्माण झाले.

त्यातूनही शेतकऱ्यांनी फळ छाटणी केली. परंतु परतीच्या पाऊस हा फळ छाटणी केलेल्या द्राक्ष पिकाला मारक ठरला. त्यामुळे घड जिरणे, गळकूज अशा समस्या उद्भवल्या. परिणामी घडांची संख्या कमी झाल्याने द्राक्षाच्या उत्पादनात घट निश्चित आहे. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये फळ छाटणी केलेले पीक चांगले आहे. सध्या द्राक्ष विक्रीचा हंगाम सुरू झाला असला तरी, फारशी गती आली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात द्राक्ष विक्रीला गती येईल.

वास्तविक पाहता, बेदाणा निर्मितीसाठी डिसेंबर महिन्यापासून शेडची दुरुस्तीची लगबग सुरू होते. अतिवृष्टी, परतीचा पाऊस आणि अवकाळी पाऊस या साऱ्याचा फटका द्राक्ष बागेला बसला आहे. साऱ्यामुळे बेदाणा निर्मितीचा हंगाम एक महिला लांबणीवर पडणार अशी शक्यता आहे. त्यामुळे यंदा शेडवर दुरुस्तीची कामे शेड मालकांनी हाती घेतली नाहीत.

त्यामुळे परराज्यातील मजूर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शेडवर येणार आहेत. त्यानंतर जानेवारीच्या मध्यापासून बेदाणा शेड दुरुस्तीची कामे सुरू करण्याचे नियोजन असल्याने बेदाणा शेड मालकांनी सांगितले आहे. बेदाणा निर्मिती एक महिना लांबणीवर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा बेदाणा निर्मितीचा हंगाम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू होईल.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कमी पाऊस, अतिवृष्टी यासह नैसर्गिक संकट बेदाणा निर्मितीवर येवू लागले आहे. त्यातच बेदाणा निर्मितीचा वाढता खर्च यामुळे बेदाणा निर्मितीकडे काही अंशी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. परिणामी सांगली जिल्ह्यातील नागज यासह अन्य भाग आणि सोलापूर जिल्ह्यातील जुनोणी भागातील सुमारे १ हजार बेदाणा शेडवरील बेदाणा निर्मिती बंद झाली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष पिकावर नैसर्गिक संकट येत आहे. परिणामी बेदाणा निर्मितीचा हंगाम १५ दिवस लांबणीवर पडतो. यंदाही हंगाम एक महिना लांबणीवर पडेल, अशी शक्यता आहे.
सुनील माळी, बेदाणा शेड मालक, केरेवाडी, ता. कवठेमहांकाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget Agri: शेतकऱ्यांना ‘नारळ’

Agri Union Budget: भविष्यातील शेतीसाठी दिशादर्शक घोषणा

Union Budget 2026-27: कर्तव्यांच्या त्रिसूत्रीवर अर्थसंकल्पाचा भर

Maharashtra Winter Weather: उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा

Mango Crop: आंबा उत्पादनात ५० टक्के घट होण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT