Bedana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Market : दसरा, दिवाळीमुळे बेदाणा दर टिकून

Raisine Market Update : गणपती सणापासून बेदाणा बाजारात उलाढालीचा वेग वाढला आहे. दीड महिन्यात ४० हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : गणपती सणापासून बेदाणा बाजारात उलाढालीचा वेग वाढला आहे. दीड महिन्यात ४० हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे. गणपती उत्सवापासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. दसरा, दिवाळीनंतरही बेदाणे दरात तेजी कायम राहण्याचा अंदाज या उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

ऑगस्टपासून गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील व्यापाऱ्यांकडून बेदाण्याची खरेदी सुरु केली आहे. गणपतीनंतर आता दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तासगाव आणि सांगली, पंढरपूरच्या बेदाणा बाजारात उलाढालीला वेग आला आहे. राज्यात सुमारे ३ लाख बेदाण्याचे उत्पादन झाले होते.

जानेवारीपासून नव्या बेदाणा विक्रीस प्रारंभ झाला होता. त्यानंतर बाजारपेठेत बेदाण्याच्या दरात चढ-उतार झाला असला तरी, बेदाण्याच्या दरावर फारसा परिणाम झाला नाही. जुलैमध्ये चांगल्या प्रतीच्या बेदाण्याला १५० ते २१० रुपये प्रतिकिलो दर मिळाला होता.ऑगस्टमध्येही दर टिकून राहिले होते. त्यामुळे बेदाणा उत्पादकांना यंदाचा हंगाम गोड झाला आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरवर्षी गोकूळ अष्टमी, गणपती, दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याच्या दरात तेजी येते. त्यामुळे शेतकरीही बेदाणा विक्रीसाठी या तेजीची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा सणांच्या निमित्ताने बाजारात बेदाण्याची मागणी आणि उठावही चांगला झाला आहे.

गेल्या दीड महिन्यात सुमारे ५० हजार बेदाण्याची विक्री झाली आहे. दरम्यान, नव्या बेदाण्याचा हंगाम सुरु झाल्यापासून आजअखेर २ लाख २५ हजार ते २ लाख ३० हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे. सध्या राज्यात ६५ ते ७० हजार टन बेदाणा शिल्लक आहे.

प्रतवारीनुसार बेदाणा दर (रुपये, प्रतिकिलो)

हिरवा बेदाणा---१२० ते २२०

पिवळा---१३० ते १८०

काळा---३० ते ७०

गणेशोत्सवापासून होते दरात वाढ

दरवर्षी रमजान महिना, ईद, गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याच्या दरात तेजी येते. खरेदी-विक्रीची लगबग वाढते. यंदा सणानिमित्त बेदाण्याला मागणी वाढली आहे, दरातही तेजी आहे. त्यामुळे शेतकरी बेदाणा विक्रीचे नियोजन करू लागले होते. बेदाण्याच्या दरातील तेजीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महिनाभर बाजार बंद राहणार

तासगाव आणि सांगलीतील बेदाणा बाजारातील उलाढाल एका महिन्यांसाठी बंद राहणार आहे. ही दरवर्षीची प्रक्रिया आहे. यंदा २८ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या काळात बाजार बंद राहील. वर्षभरात झालेले खरेदी-विक्रीचे व्यवहार या महिनाभरात पूर्ण केले जातात. सर्वांची देणी चुकती करून आर्थिक व्यवहार शून्यावर आणले जातात आणि पुन्हा नव्याने आर्थिक व्यवहार केले जातात. शेतकरी, व्यापारी, मोठे होलसेल विक्रेते सर्वांचे हिशेब या काळात पूर्ण केले जातात.

गणेशोत्सवापासून बाजारपेठेत बेदाण्याची मागणी आणि दर टिकून आहेत. त्यामुळे बेदाण्याचा उठावही चांगला झाला आहे. दिवाळीनंतरही बेदाण्याचे दर टिकून राहतील, असा अंदाज आहे.
- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biochar Production: कर्ब संवर्धनासाठी पीक अवशेषांपासून बायोचार निर्मिती

Turmeric Farming: हळद, आले पिकांतील अन्नद्रव्ये व्यवस्थापन 

Armyworm in Maize: मक्यातील लष्करी अळीचा करा नायनाट; कीड व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती

Great Indian Bustard: माळढोक अभयारण्याच्या राखीव क्षेत्रात सोडले घातक रसायन 

Lumpy Disease: मोहोळमध्ये ‘लम्पी स्कीन’ने दोन जनावरांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT