Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : परभणी, हिंगोलीत कापसाची १२.७० लाख क्विंटल खरेदी

Cotton Procurement : खरेदी हंगाम २०२३-२४ च्या अंतिम टप्प्यात परभणी व हिंगोली जिल्ह्यांत खासगी कापूस खरेदी सुरू आहे.

माणिक रासवे

Parbhani News : खरेदी हंगाम २०२३-२४ च्या अंतिम टप्प्यात परभणी व हिंगोली जिल्ह्यांत खासगी कापूस खरेदी सुरू आहे. मात्र सीसीआयची कापूस खरेदी बंद आहे. गुरुवार (ता. २) अखेरपर्यंत राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी झोनअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गत ४३ जिनिंग कारखान्यांमध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून १२ लाख १ हजार ९२७ क्विंटल आणि भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) ७ केंद्रांवर ६८ हजार ११८ क्विंटल व कापूस खरेदी झाली आहे.

या दोन जिल्ह्यांत सीसीआय आणि खासगी मिळून एकूण १२ लाख ७० हजार ४५ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यांमधील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जाहीर लिलावाद्वारे खासगी व्यापाऱ्याकडून कापूस खरेदी केली जात आहे.

त्यात परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, ताडकळस या ९ बाजार समित्यांअंतर्गत ३९ जिनिंग कारखान्यांमध्ये ११ लाख ३१ हजार ३४९ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली व आखाडा बाळापूर बाजार समित्यांतर्गतच्या ४ जिनिंग कारखान्यांमध्ये ७० हजार ५७८ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. या दोन जिल्ह्यात खासगी व्यापाऱ्यांकडून एकूण १२ लाख १ हजार ९२७ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. मागील आठवड्यात कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७२०० ते ७६६० रुपये दर मिळाले

भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआयची) परभणी जिल्ह्यातील जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, ताडकळस या ५ केंद्रांवर एकूण ६३ हजार १३३ क्विंटल व हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली येथे १ हजार २८३ क्विंटल शिरडशहापूर (ता. औंढा नागनाथ) येथील केंद्रावर ३ हजार ७०२ क्विंटल मिळून एकूण ४ हजार ९८५ क्विंटल कापूस खरेदी झाली.

सीसीआयीची या दोन जिल्ह्यातील ७ केंद्रावर ६८ हजार ११८ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. चांगल्या दर्जाच्या कापसाचे खुल्या बाजारीतील दर हमीभावापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे सीसीआयची खरेदी केंद्रावरील कापूस खरेदी मागील काही आठवड्यापासून बंद आहे, अशी माहिती पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली.

खासगी कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

बाजार समिती...जिनिंग संख्या...कापूस खरेदी

परभणी...७...१७३७६३

जिंतूर...४...१४७०२९

बोरी...१...४९५३५

सेलू...६...२८३२२१

मानवत...१३...३५८१९३

पाथरी...२...२२११९

सोनपेठ...१...३०३३५

गंगाखेड...३...१९६५५

ताडकळस...२...४५०९

हिंगोली...३...६४१७२

आखाडा बाळापूर...१...६४०६

सीसीआय कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

केंद्र ठिकाण...जिनिंग संख्या...कापूस खरेदी

जिंतूर...१...१३५६९

बोरी...१...११८७७

सेलू...१...१६७८०

मानवत...१...२०१९३

ताडकळस...१...७१४

हिंगोली...१...१२८३

शिरडशहापूर...१...३७०२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT