Mango Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Kesar Mango Market : केसर आंब्यांचे दर टिकून

Kesar Mango Rate : उत्पादनात घट व अपेक्षेपेक्षा कमी आवक असल्याने मराठवाड्यातील केसर आंब्याचे दर टिकून आहेत

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Mango Market Update : उत्पादनात घट व अपेक्षेपेक्षा कमी आवक असल्याने मराठवाड्यातील केसर आंब्याचे दर (Kesar Mango Rate) टिकून आहेत. कच्च्या आंब्याला दर्जानुसार ३० ते ९० रुपयांपर्यंत तर पिकलेल्या आंब्याला ८० ते १२० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळत आहे, अशी माहिती केसर आंबा उत्पादक व व्यापाऱ्यांनी दिली.

कोकणाव्यतिरिक्त उर्वरित राज्यात ४५ हजार हेक्‍टरवर आंबा लागवड आहे. त्यापैकी साधारणतः २० ते २१ हजार हेक्टरवर आंबा बागा उत्पादनक्षम असाव्यात. त्यातील काही बागा २० ते २५ वर्षे जुन्या आहेत. वादळी पावसामुळे काढणीचा हंगामही लांबला आहे. मोहरासाठी हवामान प्रतिकूल राहिले.

मराठवाड्यासह अनेक भागांतील केसर आंबा उत्पादनात सरासरी ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत घट दिसते आहे. वादळ अतिपाऊस व गारपिटीचा तडाखा बसलेल्या भागांमध्ये घटीचे हे प्रमाण ४० ते ८० टक्क्यांपर्यंत असल्याचे आंबा उत्पादकांनी सांगितले.

गुजरातच्या केसरचीही अपेक्षित आवक नाही. मराठवाड्यातील केसरला सुरुवातीला २०० रुपये प्रतिकिलो पर्यंत दर मिळाला. त्यानंतर तो १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत आला. अलीकडे तो १२० रुपये प्रतिकिलोपर्यंत टिकून आहे.

मंगळवारी (ता. ८) लातूरमध्ये कच्च्या केसरला ३० ते ६० रुपये प्रतिकिलो तर पिकलेल्या केसरला ५० ते ७० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये कच्च्या केसरला ५५ ते ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत तर पिकलेल्या केसरला ८० ते १३० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळाला. जालन्यात कच्च्या केसरचा दर ८० रुपये, तर पिकलेल्या केसरला १२० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळाला.

गेल्या वर्षी ज्या बागेतून विक्रीसाठी २० टन पेक्षा जास्त आंबा मिळाला, त्याच बागेतून यंदा १२ ते १४ टनापर्यंतच उत्पादन हाती लागते आहे. त्याचा थेट परिणाम विक्री कमी होण्यावरही होत आहे.
- देविदास बनकर, आंबा विक्रेता, छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT