Soybean Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Cotton Rate : यवतमाळमध्ये कापसाच्या दरात चारशे, तर सोयाबीनच्या दरात पाचशे रुपयांची घट

गेल्या आठवड्यात कापूस, सोयाबीनचे दर वाढले होते. मात्र आठवडाभरातच दर कोसळले. कापसाचे दर ९,२०० रुपयांवर गेले होते ते ८,७०० रुपयांवर आले आहेत.

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : गेल्या आठवड्यात कापूस, सोयाबीनचे दर (Cotton Soybean Rate) वाढले होते. मात्र आठवडाभरातच दर कोसळले. कापसाचे दर (Cotton Rate) ९,२०० रुपयांवर गेले होते ते ८,७०० रुपयांवर आले आहेत. सोयाबीनला (Soybean Rate) प्रतिक्विंटल ६,००० रुपये दर झाला होता. यातही घट झाली असून, दर ५,५०० रुपयांवर आले आहेत. या दोन प्रमुख पिकांसोबत तुरीचे दरही खाली आले आहेत.

गेल्या आठवड्यात सोयाबीन, कापसाच्या दरात तेजी आली होती. दर वाढल्याने बाजारात सोयाबीनची आवक वाढली होती. कापसाचे दर नऊ हजारांच्या पुढे गेल्याने आणखी दर वाढण्याची आशा शेतकऱ्यांना होती. तज्ज्ञांच्या मते, कापूस दहा हजार रुपयांचा आकडा पार करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

कापसाच्या दरात तेजी आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. बाजारात कापूस, सोयाबीनची आवक वाढायला सुरुवात झाली होती. मात्र आठवडाभरात पिकांचे दर पुन्हा खाली आले आहेत. गेल्या आठवड्यात कापसाचे दर नऊ हजार दोनशे रुपयांवर गेले होते. पार्वती कोटेक्स या प्रक्रिया उद्योजकाने अवघ्या एक क्विंटलला हा दर दिला. ते दर खाली आले असून, मंगळवारी (ता.२२) कापसाला आठ हजार सातशे रुपये दर मिळाले.

दर खाली आल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. कापसासोबत सोयाबीनचे दर खाली आले आहेत. चिंतामणी खासगी बाजारात सोयाबीनचे दर सहा हजारांच्या पुढे गेले होते. ४-५ क्विंटलची ही खरेदी झाली. ते आता ५,५०० रुपयांवर आले आहेत.

दोन दिवसांत पाचशे रुपयांची कमी

शुक्रवारी (ता. १७) कापसाला एका क्विंटलला पार्वती कोटेक्समध्ये नऊ हजार दोनशे रुपये दर मिळाले होते. त्यामुळे या महिन्यात कापसाचे दर दहा हजारी गाठेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. तशीच स्थिती सोयाबीनची होती. सोयाबीनचे दर चिंतामणी खासगी बाजारात सहा हजार रुपयांवर पोहोचले होते. दोन दिवस सुट्टी आल्यानंतर सोमवारी बाजार उघडले. मंगळवारी (ता.२२) कापूस, सोयाबीन दोन्ही पिकांचे दर खाली आले असून, क्विंटलमागे पाचशे रुपयांची घट झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

Lemon Rate: अमरावतीत लिंबाला ६००० ते ७००० रुपये दर

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी

SCROLL FOR NEXT