Potato Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

बटाटा वर्षभर महाग राहणार

उत्पादक प्रदेशातच लागवड क्षेत्र घटले

टीम ॲग्रोवन

अमरावती : सर्वसामान्यांच्या आहारातील मुख्य असलेला बटाटा (Potato) यंदा वर्षभर महागण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारात बटाट्याची आवक (Potato Arrival) मंदावल्याने बटाट्याच्या दरात (Potato Rate) सुधारणा झाली. उत्तर प्रदेशातील आग्रा येथून सध्या बटाट्याची आवक होत आहे. यंदा बटाट्याचे दर तेजीत राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली आहे. किरकोळ बाजारात एक किलो बटाट्याचे दर प्रतवारीनुसार ३० ते ४० रुपये आहेत.

बटाट्याची सर्वाधिक लागवड उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात होते. आग्रा, इंदूर येथील बाजारपेठेतून देशभरात बटाटा विक्रीस पाठविण्यात येतो. आग्रा, इंदूर येथील बाजारपेठेतील घाऊक बाजारात प्रतवारीनुसार एक किलो बटाट्याला १८ ते २० रुपये दर मिळाला आहे. आग्रा येथील बटाट्याची आवक कमी झाल्याने सध्या बाजारात बटाट्याला चांगले दर मिळत असून, किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये दराने विक्री केली जात आहे.

उत्तर व मध्य प्रदेशासोबतच पुणे व नाशिकमधूनही बाजारात बटाट्याची आवक होते. मागणीच्या तुलनेत या बटाट्याची आवक कमी पडते. त्यामुळे परराज्यातील बटाट्याला वर्षभर मागणी असते. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रोज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातून मिळून साधारणपणे ४५० ते ४७० क्विंटल बटाट्याची आवक होत आहे. अवकाळी पावसामुळे गावरान बटाट्याच्या लागवडीवर परिणाम झाल्याने सध्या बाजारात बटाट्याचा तुटवडा जाणवत असून, परिणामी किरकोळ बाजारात वाढ झाली आहे.

बटाटा उत्पादक प्रदेशांमध्ये बटाटा लागवड २० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे बटाट्याचे दर यंदा वर्षभर तेजीत राहणार आहेत. किरकोळ बाजारात बटाट्याचे दर साधारणपणे ३० ते ४० रुपये प्रति किलो आहेत. वाहतूक खर्च तसेच अन्य खर्च विचारात घेता किरकोळ बाजारात बटाट्याचे दर वाढीव राहणार आहेत.
शंकर खारकर, थोक विक्रेता

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT