Chana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Import : ऑस्ट्रेलियातून ११ लाख टन हरभरा आयातीची शक्यता

Chana Market : कमी उत्पादनाचा फटका बसल्याने देशांतर्गत पुरवठा सुधारण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून सुमारे १.१ दशलक्ष टन हरभरा आयात करण्यात येण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

New Delhi News : कमी उत्पादनाचा फटका बसल्याने देशांतर्गत पुरवठा सुधारण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून सुमारे १.१ दशलक्ष टन हरभरा आयात करण्यात येण्याची शक्यता आहे. ही आयात देशात होणाऱ्या १.६ दशलक्ष टन पिवळ्या वाटाण्याच्या आयातीच्या व्यतिरिक्त आहे. हा पिवळा वटाणा हरभऱ्याला पर्याय म्हणून वापरला जातो. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यावरील आयात शुल्क रद्द केल्याची घोषणा करण्यात आली होती.

देशातील एकूण डाळींच्या उत्पादनापैकी ५० टक्के वाटा असलेल्या हरभरा उत्पादनात मोठी घसरण झाली. त्यामुळे सरकारने पिवळा वाटाणा आणि बंगाल हरभऱ्यावरील आयात शुल्क रद्द करण्यासारख्या अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. इतर भागातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे.

“गेल्या महिन्यात सरकारने योग्य वेळी हरभरा आयात शुल्क हटविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील उत्पादकांना सकारात्मक संकेत मिळाला. परिणामी, यावर्षी पेरणीत वाढ झाली,” असे मयूर ग्लोबल कॉर्पोरेशनच्या प्रमुख हर्षा राय यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियातील हरभऱ्याची काढणी सप्टेंबरच्या आसपास होण्याची अपेक्षा आहे.

सरकारने गेल्या महिन्यात हरभऱ्यावरील आयात शुल्क हटवले आणि हरभरा दरातील वाढ रोखण्यासाठी पिवळ्या वाटाण्यांवरील आयात शुल्कातील सूट ऑक्टोबरपर्यंत वाढविली. ऑक्टोबर २०२३ पासून हरभऱ्याच्या किमतीत दोन अंकी वाढ झाली आहे.

राजस्थान आणि मध्य प्रदेश या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये हरभऱ्याच्या किमती ५ हजार ४४० रुपयांच्या किमान विक्री मूल्यापेक्षा (एमएसपी) अधिक म्हणजे ७ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास आहेत. अलीकडच्या वर्षांत प्रथमच भाव ७ हजार रुपये प्रतिक्विंटलपुढे गेल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

यंदा उत्पादन १0 लाख ३१ हजार टनांनी घटण्याचा अंदाज

कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, २०२३-२४ या वर्षात हरभऱ्याचे उत्पादन ११ लाख ५७ हजार टन असेल. हे उत्पादन मागील वर्षीच्या १२ लाख २६ हजार टनांपेक्षा कमी आहे. दरम्यान, व्यापारी सूत्रांनी या अधिकृत अंदाजापेक्षा खूपच कमी उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

हरभऱ्याच्या संरक्षित साठ्यात लक्षणीय घट

हरभऱ्याच्या किमती ‘एमएसपी’च्या वर असल्याने व्यापारी सूत्रांनी सांगितले की, चालू हंगामात (एप्रिल-जून) ‘नाफेड’ने भावांतर योजना (प्राइस सपोर्ट स्कीम) अर्थात ‘पीएसएस’ अंतर्गत १० लाख टन उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ४० हजार टन हरभऱ्याची खरेदी केली आहे. ‘नाफेड’ने २०२३-२४ आणि २०२२-२३ च्या हंगामात ‘पीएसएस’अंतर्गत अनुक्रमे २.३ दशलक्ष टन आणि २.६ दशलक्ष टन हरभरा खरेदी केला होता. हरभऱ्याच्या संरक्षित साठ्यात सध्या १ दशलक्ष टन प्रमाणापेक्षा लक्षणीय घट झाली आहे, असे सूत्रांनी सांगितली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT