Chana Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Procurement : अनेक संस्थांचे पोर्टल अद्याप बंदच

राज्यात किमान हमीदरानुसार शेतकऱ्यांचा हरभरा ‘नाफेड’ (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ)कडून खरेदी करण्यात येतो.

Team Agrowon

Chana Market Update नांदेड : राज्यात किमान हमीदरानुसार (MSP Procurement) शेतकऱ्यांचा हरभरा ‘नाफेड’ (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ)कडून खरेदी (Chana Procurement) करण्यात येतो.

परंतु आजही अनेक संस्थांचे शेतकरी नोंदणीचे पोर्टल अद्याप बंदच आहे. या बाबत शेतकरी ओरड करत असल्याची तक्रार खरेदीदार संस्थांनी ‘नाफेड’ (NAFED) आणि पणनकडे केली आहे.

राज्यात केंद्र शासन रब्बी हंगाम २०२३ अंतर्गत नाफेडच्या माध्यमातून किमान हमीदरानुसार आठ लाख दहा हजार टन हरभरा खरेदी करणार आहे. यासाठी २७ फेब्रुवारीपासून विक्रीपूर्व नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते.

तर १४ मार्चपासून खरेदी होणार असल्याची पणनकडून कळविण्यात आले. यामुळे राज्यात आठ राज्यस्तरीय संस्थांच्या खरेदी केंद्राकडे हजारो शेतकऱ्यांनी विक्रीपूर्व नाव नोंदणीसाठी सातबारा, आधार आणि बँक पासबुक असे कागदपत्र जमा केले आहेत.

परंतु अनेक संस्थांच्या खरेदी केंद्राची ऑनलाइन विक्रीपूर्व नोंदणीचे पोर्टल अद्याप ‘नाफेड’कडून सुरू करण्यात आले नाही. परिणामी, खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी गर्दी करून नोंदणीसाठी आग्रह धरला आहे. याबाबत खरेदीदार संस्थांच्या प्रतिनिधींनी मुंबई काठून नाफेड, पणनसह सत्ताधाऱ्यांकडे आग्रह धरला आहे.

शेतकऱ्यांत असंतोष

यंदा राज्यात हरभऱ्याचे बंपर उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना शासनाच्या खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. दर पडल्यामुळे यापूर्वीच शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन, कपाशी पडून आहे.

आता हरभरा आल्यामुळे शेतकरी शासनाच्या खरेदी केंद्राला विक्रीसाठी आग्रही आहे. परंतु अद्याप अनेक जिल्ह्यांत विविध राज्यस्तरीय संस्थांच्या खरेदी केंद्राचे नोंदणी पोर्टल सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांत असंतोष उफाळला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT