Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : खेडा खरेदीवर ठेवा ‘वॉच’

यंदा कापसाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता असतानाच दरात झळाळी आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Team Agrowon

यवतमाळ : यंदा कापसाच्या उत्पादनात (cotton production) घट येण्याची शक्यता असतानाच दरात (Cotton Rate) झळाळी आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. दुसरीकडे गावात जाऊन खेडा खरेदीचा प्रकार यंदा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी बाजार समित्यांचे सचिव, सहायक निबंधकांना शुक्रवारी (ता. ४) कापूस खरेदीसंदर्भातील नियोजनाच्या बैठकीत दिलेत.

यंदा सुरुवातीपासूनच कापसाचे दर चांगले आहेत. गेल्या वर्षी कापसाला चांगले दर मिळाले होते. मात्र अखेरच्या टप्प्यात दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच त्याचा फायदा अधिक झाला. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला चांगले दर मिळण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. तो खरा होताना दिसून येत आहे.

कापसाचा दर दहा हजार रुपयांवर गेलेला आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत आहे. कापसाचे पीक चांगले दिसतानाही उत्पादन कमी येत असल्याचे वास्तव आहे. यंदा कपाशीला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. पिकाची वाढ खुंटल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची भीतीदेखील व्यक्त केली जात आहे.

शिवाय, कापूस उशिरा हातात येईल, असाही अंदाज आहे. काही भागांत बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. त्यातून कपाशी पीक शेतकऱ्यांच्या हाती आल्यास यंदा मोठ्या प्रमाणावर कापसाला दर मिळण्याची शक्यता आहे. ‘सीसीआय’ व पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे नियोजन पूर्ण केलेले आहे.

मात्र अजूनही केंद्र सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात कापसाला १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. यंदा खासगी बाजाराचा शुभारंभ झाला तेव्हा चांगला दर देण्यात आला. त्यामुळे या दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात कापूस बाजारात येण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti: कोकणातील बागायतदारांची क्रूर थट्टा, राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांच्या मदतीच्या घोषणेवर टीका

Nashik ZP Budge: ‘झेडपी’च्या अर्थसंकल्पात कृषी, पशुसंवर्धनासाठी ७.१८ कोटी

Shade Net House: उन्हाळ्यामध्ये शेडनेट हाउसमधील व्यवस्थापन

Burhanpur Ankleshwar Highway: बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रक्रियेस गतीच नाही

Agrowon Podcast: कापसात काहिशी सुधारणा, कांदा भाव दबावातच, काकडीचा भाव टिकून, गव्हाची आवक वाढली, कैरीला उठाव

SCROLL FOR NEXT