Papaya  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Papaya Market : खानदेशात पपई आवक स्थिर

Papaya Arrival In Khandesh Market : खानदेशात पपईची आवक टिकून आहे. दर थेट जागेवर किंवा शिवार खरेदीत शेतकऱ्यांना तीन ते चार रुपये प्रतिकिलो, असे मिळत आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात पपईची आवक टिकून आहे. दर थेट जागेवर किंवा शिवार खरेदीत शेतकऱ्यांना तीन ते चार रुपये प्रतिकिलो, असे मिळत आहेत. दरात मागील २५ ते २६ दिवसांत कुठलीही सुधारणा झालेली नाही. खानदेशात डिसेंबरमध्ये पपईची आवक वाढली. सध्या प्रतिदिन ४५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) पपईची आवक खानदेशात होत आहे.

सर्वाधिक आवक नंदुरबार जिल्ह्यात होत आहे. पपईची पाठवणूक पंजाब, हरियाना, दिल्ली, काश्मीर, उत्तर प्रदेशात केली जात आहे. पपईचे दर ऑक्टोबरनंतर सतत कमी झाले. ऑक्टोबरमध्ये सरासरी ३५ रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना जागेवर मिळाला होता. या कालावधीत पपईची आवकही अल्प होती.

नोव्हेंबरमध्ये सरासरी दर २० रुपये प्रतिकिलो, असा जागेवर शेतकऱ्यांना मिळाला. परंतु डिसेंबरमध्ये दरात मोठी घट झाली. डिसेंबरमध्ये सरासरी दर सहा रुपये प्रतिकिलो, असा मिळाला. डिसेंबरमध्ये आवकेत सतत वाढ झाली. आवक अधिक व मागणी कमी, अशी स्थिती होती.

या कालावधीत अनेकांनी पपई बागा परवडत नसल्याने त्या काढून फेकल्या. या महिन्यात प्रतिकिलो सरासरी तीन रुपये दर शेतकऱ्यांना पहिल्या पंधरवड्यात थेट जागेवर पपई विक्रीसंबंधी मिळाला.

पपईची आवक सध्या स्थिर आहे. डिसेंबरमध्ये आवक काही दिवस ५५ ते ६० ट्रक होती. त्यात चढउतार झाला. परंतु या महिन्यातील आवक काही दिवस ५० ट्रक राहिली. तर सध्या ४५ ट्रक पपईची आवक होत आहे. दर प्रतिकिलो तीन ते चार रुपये प्रतिकिलो, असे दर्जानुसार मिळत आहेत.

रोज २५ ते २६ ट्रक आवक

नंदुरबारात रोज २५ ते २६ ट्रक पपईची आवक होत आहे. शहादा तालुक्यात सर्वाधिक साडेचार हजार हेक्टरवर पपईची लागवड झाली होती. यामुळे या भागात आवक अधिक आहे.

१५ नंबर व ७८६ वाणांच्या पपईची लागवड खानदेशात झाली असून, १५ नंबर वाणाच्या पपईतून आवक रखडत सुरू आहे. ७८६ वाणांच्या बागांमध्ये नैसर्गिक समस्या व विषाणूजन्य रोगांमुळे फळाचे नुकसान झाले आहे. याचाही फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यात यंदा दर कमी असल्याने आर्थिक नुकसानदेखील सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Sowing: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात पेरणी सुरू

Irrigation Water Crisis: इंदापुरात शेतकरी पाण्यासाठी आक्रमक

Wildlife Conservation: पाच एकर शेती वन्यजीवांसाठी राखीव

Ashadhi Wari 2026: तुकोबारायांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती नव्हे, कर्जवसुली योजना

SCROLL FOR NEXT