Papaya Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Papaya Market : खानदेशात पपई आवक घटली

Papaya Rate : खानदेशात पपईची आवक मागील सात ते आठ दिवसांत सुमारे पाच ट्रकनी (एक ट्रक १६ टन क्षमता) घटली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात पपईची आवक मागील सात ते आठ दिवसांत सुमारे पाच ट्रकनी (एक ट्रक १६ टन क्षमता) घटली आहे. दर्जेदार पपईचे दर नऊ रुपये प्रतिकिलोवर स्थिर आहेत. पुढे उष्णता वाढणार असल्याने आवक आणखी कमी होईल.

उत्तरेकडे अद्याप थंड वातावरण आहे. तेथे पपईस उठाव आहे. पपईची आवक खानदेशात जानेवारीत घटली. त्यात सतत घट होत आहे. डिसेंबर व जानेवारीत पपई दरांचा चार-पाच वेळेस तिढा तयार झाला.

नंदुरबारातील शहादा भागात पपईचे पीकही याच काळात खराब झाले. शेतकऱ्यांनी कमी दर व खराब पीक यामुळे पीक काढले. तेथे सुमारे एक हजार हेक्टरवरील पपईचे पीक काढण्यात आले.

अन्यत्रही पपईची आवक कमी झाली. यातच फेब्रुवारीत पपईची मागणी आली. डिसेंबरमध्ये पपईचे दर सरासरी अडीच रुपये प्रतिकिलो असे जागेवर किंवा शिवार खरेदीत शेतकऱ्यांना मिळाले.

तर जानेवारीत सरासरी तीन रुपये प्रतिकिलोचे दर जागेवर मिळाले. दर ६० ते ६५ दिवस अल्प होते. शेतातच पपई खराब होत होती. परंतु फेब्रुवारीत पपईला उत्तरेकडून मागणी आली. दुसरीकडे आवक कमी होती. यामुळे पपईच्या दरात सुधारणा झाली.

मागील तीन-चार दिवसांत आवक घटली आहे. परंतु दरातही मोठी वाढ झालेली नाही. दरही किमान सात व कमाल नऊ रुपये प्रतिकिलो आहेत. दर्जेदार पपईचे दर नऊ रुपयांपर्यंत आहेत. उत्तर भारतात पपईची पाठवणूक एजंट करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT