Cotton Market | Cotton Procurement |Cotton Market Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : ‘पणन’ला कापूस खरेदीची परवानगी मिळणे धूसर

बाजारभावाने ‘सीसीआय’च्या धर्तीवर कापूस खरेदीची तयारी पणन महासंघाने दर्शविली असली तरी परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षीही पणन महासंघाला कापूस खरेदी करता येणार नाही.

टीम ॲग्रोवन

अमरावती : बाजारभावाने ‘सीसीआय’च्या (CCI) धर्तीवर कापूस खरेदीची (Cotton Procurement) तयारी पणन महासंघाने दर्शविली असली तरी परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षीही पणन महासंघाला कापूस खरेदी करता येणार नाही. खरेदीसाठी लागणाऱ्या कर्जाची शासनाने हमी घेतल्यास महासंघास कापूस खरेदी करता येणार आहे. मात्र ती शक्यताही कमी आहे.

हिवाळी अधिवेशनादरम्यान महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांच्या नेतृत्वात उपाध्यक्ष प्रसेनजित पाटील व संचालक संजय पवार यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांना कापूस खरेदीसाठी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव दिला. शासनाने कर्जाची हमी घेतल्यास महासंघ कापूस खरेदी करण्यास तयार आहे, असा हा प्रस्ताव आहे. त्याच वेळी ‘सीसीआय’कडून परवानगी मिळावी, असेही प्रयत्न करण्याची गळ घालण्यात आली आहे.

‘सीसीआय’च्या धर्तीवर कापूस खरेदीची तयारी कापूस पणन महासंघाने केली. त्यासाठी ‘सीसीआय’ने परवानगी द्यावी, असे प्रयत्न सुरू आहेत. कापूस खरेदीसाठी लागणाऱ्या पैशांच्या तरतुदीसाठी बँकेकडून महासंघाला कर्ज घ्यावे लागेल. त्यासाठी राज्य सरकारने हमी घेणे आवश्यक आहे. यापूर्वी अशी हमी घेतल्यानंतर महासंघाने बँकेकडून कर्ज घेत हमीदराने कापूस खरेदी केली आहे. गाठी व सरकी विकून कर्जाची परतफेडही केली आहे.

यंदा कापूस खरेदीसाठी ‘सीसीआय’ने महासंघास सबएजंट म्हणून परवानगी दिलेली नाही. सलग दुसऱ्या वर्षी महासंघ त्यामुळे अडचणीत सापडला आहे. ‘सीसीआय’ ८४०० रुपये क्विंटल या बाजारभावाने कापूस खरेदी करणार आहे. महासंघाकडे या भावाने खरेदीसाठी पैसे नाहीत. त्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यावे लागणार आहे. त्यासाठी राज्य सरकारची हमी आवश्यक आहे. ती दृष्टिपथात नाही.

गुलाबराव पाटील यांच्यामार्फत राज्य सरकारला कापूस खरेदीसाठी महासंघास परवानगी मिळावी म्हणून प्रस्ताव दिला. ती मिळण्याची शक्यता कमी आहे. कापूस खरेदीसाठी महासंघाकडे पैसा नसल्याने बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्य सरकारने कर्जास हमी द्यावी, अशी विनंती करणार आहे.

- अनंतराव देशमुख, अध्यक्ष, कापूस पणन महासंघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT