Paddy Procurment 
मार्केट इन्टेलिजन्स

Paddy Procurement : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाताची खरेदी धीम्या गतीने

किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २१ केंद्रांवर भातखरेदी सुरू झाली आहे.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत (MSP Procurement Scheme) जिल्ह्यातील २१ केंद्रांवर भातखरेदी (Paddy Procurement) सुरू झाली आहे. आतापर्यंत अवघी ७ हजार ७१८ क्विंटल खरेदी झाली आहे. धीम्या गतीने ही खरेदी सुरू आहे. अजूनही १७ केंद्रांवर भातखरेदी सुरू झाली नसल्याची स्थिती आहे.

किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत जिल्ह्यात भातखरेदी सुरू झाली आहे. या वर्षी शासनाने प्रतिक्विंटल २०४० रुपये दर जाहीर केला आहे. गेल्या वर्षी १९९० रुपये दर होता. गेल्या वर्षी २८ भातखरेदी केंद्रांना शासनाने मंजुरी दिली होती. या केंद्रांवर पूर्ण हंगामात ८९ हजार क्विंटल भातखरेदी झाली होती.आतापर्यंतच्या हंगामातील ही सर्वांत मोठी खरेदी होती.

दरम्यान, या वर्षी शासनाने ३८ भातखरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. यातील २१ केंद्रांवर आतापर्यंत खरेदी सुरू झाली आहे. जिल्ह्यात तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून भातखरेदी केली जाते. भातविक्रीला अजूनही थंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत केवळ ७ हजार ७१८ क्विंटल भात खरेदी झाली आहे. येत्या आठ दिवसांत खरेदी अधिक जलदगतीने सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

जिल्ह्यात ३८ भातखरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. आतापर्यंत ७ हजार ७१८ क्विंटल भातखरेदी झाली आहे. भातखरेदीसाठी आवश्यक बारदाणे आणि इतर सर्व साहित्य पुरेसे आहे.

- ए. एस. देसाई, व्यवस्थापक, मार्केटिंग फेडरेशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT