Paddy Procurement Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Paddy Rate : भाताला प्रतिक्विंटल दोन हजार ४० रुपये दर

यंदा आदिवासी विकास महामंडळाकडून प्रतिक्विंटल २ हजार ४० रुपये एवढा भाव दिला आहे.

Team Agrowon

जव्हार : यंदा आदिवासी विकास महामंडळाकडून प्रतिक्विंटल २ हजार ४० रुपये एवढा भाव (Paddy Rate) दिला आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी महामंडळाच्या खरेदी (Paddy Procurement) केंद्रावर आपले धान्य द्यावे, असे आवाहन महामंडळाचे संचालक आमदार भुसारा यांनी या वेळी केले. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार असल्याने पारदर्शक कारभाराचा आधार घ्यावा, असेही यावेळी भुसारा यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून होणाऱ्या आधारभूत खरेदी केंद्राचे उद्‌घाटन आमदार सुनील भुसारा यांच्या हस्ते जव्हार आणि मोखाडा येथे झाले. या वेळी ते बोलत होते.

मागील सरकारच्या काळात आम्ही महामंडळाच्या केंद्रावर धान्य देणाऱ्या शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे अनुदान दिले होते. आताची वाढलेली महागाई पाहता यंदा अनुदान म्हणून १ हजार रुपये द्यावे, अशी मागणी भुसारा यांनी केली. तसेच या आधारभूत खरेदीमध्ये १ क्विंटलपेक्षा जास्त धान्यच खरेदी करता येते, यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांची अडचण होते.

यासाठी एकाधिकार खरेदी योजनाही सुरू करावी, अशी मागणी यावेळी सरकारकडे भुसारा यांनी केली आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख, प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे, उपप्रादेशिक व्यवस्थापक राजेश पवार, तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर वाडा, विक्रमगड, जव्हार या भागातही आधारभूत खरेदी केंद्रे सुरू होणार आहेत. तसेच या भागात पिकांचे नुकसान कमी झालेले असले तरी शासनाने पंचनामे करून ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी भुसारा यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Roll Revision Protest: ‘एसआयआर’ प्रक्रिया थांबवा : डाॅ. अजित नवले

Tomato Farming Success Story: टोमॅटो शेतीतून प्रगती गाठलेले बोरीबेल

Drought Management: सरपंचांनो, गावाचा ताळेबंद मांडा..

Minimum Support Price: ‘कमी’भाव जाहीर

Drought Mitigation: दुष्काळ निवारणाला द्या नवा आयाम

SCROLL FOR NEXT