Jaggery Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jaggery Market : केवळ एक किलो गुळाचे सौदे; पेच कायम

शेतकऱ्यांनी खासगी मजूर आणून १ किलो गूळ रवे सौद्याला लावले. त्याचे सौदेही झाले, मात्र यालाही मर्यादा आल्या.

Team Agrowon

कोल्हापूर ः येथील बाजार समितीत (Kolhapur APMC) गूळ सौद्याचा (Jaggery Deals) पेच चौथ्या दिवशीही (शुक्रवारी) कायम राहिला. शेतकऱ्यांनी खासगी मजूर आणून १ किलो गूळ रवे सौद्याला लावले. त्याचे सौदेही झाले, मात्र यालाही मर्यादा आल्या. शिल्लक राहिलेल्या मोठ्या गुळाच्या (१० किलो) सौद्याचा पेच कायम राहिल्याने जवळपास दीड कोटीच्या गूळ रव्यांची वाहतूक खोळंबली.

चार दिवसांपूर्वी गूळ बाजारपेठेतील ५० टक्के मजुरी वाढ द्यावी. यासाठी माथाडीनी गूळ सौद्यात काम बंद आंदोलन केले. त्यानंतर बाजार समिती प्रशासक, जिल्हा उपनिबंधक तसेच जिल्हाधिकारी यांनीही बैठक घेऊन माथाडी कामगारांना गूळ सौदे काम सुरू ठेवा.

सौदे झाल्यानंतर बैठकीत चर्चा करा असे सुचवले, तसेच व्यापाऱ्यांनी अन्य बाजारपेठाच्या तुलनेत कोल्हापुरात जास्त मजुरी दिली जात आहे तरीही ५० टक्के मजुरी वाढ कोणत्या आधारावर मागत आहात असा प्रश्‍न केला, त्यावर कोणतीही ठोस माहिती उत्तर न देता आम्हाला ५० टक्के मजुरी वाढ द्यावीच याच मुद्दावर माथाडी कामगार ठाम राहून शुक्रवारी ही कामावर आले नाहीत.

शेतकऱ्यांनी सकाळी एक किलोचे गूळ रवे बाजारपेठेत आणला व्यापाऱ्यांनी सौदे काढली यात ३ हजार ५०० ते ४ हजारांचा भाव मिळाला यात वेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील खासगी कामगार आणून गूळ उतरवला.

गोदामात ठेवला. याच वेळी माथाडी कामगार माथाडी मंडळाच्या कार्यालया समोर गटागटाने थांबून होते. ते कोणीही कामावर आले नाहीत. त्यामुळे मोठे रवे गाडीतून उतरणार कोण, भरणार कोण त्याचे पॅकिंग कसे करावे असा पेच कायम राहिला. परिणामी, पुढच्या सत्रात मोठ्या गूळ रव्यांचे सौदे होऊ शकले नाहीत.

व्यापारी व शेतकऱ्यांनी गुरुवारी बैठक घेऊन अन्य बाजारपेठेतील मजूर देण्याची सुविधा बाजार समितीने करावी असे पत्र बाजार समितीला दिले होते. बाजार समितीने ही अन्य बाजारपेठेतील मजूर पाठवण्याचे पत्र माथाडी बोर्डाला दिले आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसांत अन्य बाजारपेठेतील मजूर येथे कामासाठी आणले जातील अशी शक्यता आहे.

गूळ सौदेस्थळी काही तणावाचे वातावरण होते, त्यामुळे बाजार समितीने सुरक्षारक्षकांचे पथक सौदे स्थळी लावले होते. बाहेरच्या जिल्ह्यातील मजूर आणले तर वाद होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिस बंदोबस्ताची मागणी गूळ व्यवसायाशी निगडित घटकांनी बाजार समितीकडे केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT