Market Committee  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate : कांद्याच्या दरात सुधारणा

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांदा दरात किंचित सुधारणा झाली.

सुदर्शन सुतार

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Market Committee) आवारात गतसप्ताहात कांदा (Onion) दरात किंचित सुधारणा झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४००० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज १०० ते २०० गाड्यांपर्यंत राहिली. कांद्याची सर्व आवक स्थानिक बार्शी, मोहोळ, पंढरपूर या भागासह सांगली आणि पुणे भागातून झाली. गेल्या पंधरवड्यापासून कांद्याच्या आवकेत चढ-उतार होतो आहे. पण मागणी असल्याने कांद्याच्या दरात किंचित सुधारणा झाली आहे.

कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय बटाटा, टोमॅटो, वांगी आणि कारल्याला मागणी राहिली, त्यांचे दरही पुन्हा टिकून राहिले. बटाटा आणि टोमॅटोची प्रतिदिन प्रत्येकी ५०० ते ७०० क्विंटल तर वांगी आणि कारल्याची १० ते ३० क्विंटलपर्यंत आवक राहिली.

बटाट्याला प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये, टोमॅटोला किमान ७०० रुपये, सरासरी १५०० रुपये सर्वाधिक २००० रुपये, वांग्याला किमान २५०० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये तर कारल्याला किमान २००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidarbha Heat Wave: विदर्भातील तीन जिल्ह्यांत अति उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Banana Variety Selection: कमी पावसातील लागवडीसाठी केळीचा कंद निवडताना काय तपासावे?

Cotton Cultivation: अकोल्यात कपाशीच्या लागवडीत वाढीची शक्यता

Online RTI Portal: क्षेत्रीय कार्यालयांतही ऑनलाइन माहिती अधिकार

Petrol Diesel Shortage: पेट्रोल- डिझेलचा साठा, मग पंपांवर रांगा का?; मुख्यमंत्री फडणवीसांनी खरं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT