Onion Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : नीरा बाजार समितीत कांद्याला शेकडा ३२६० रुपये दर

Onion Rate : गेली अनेक वर्षे बंद पडलेला नीरा येथील कांदा बाजार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पुन्हा सुरू करण्यात आला आहे. गेल्या वर्षी या बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री झाली होती.

Team Agrowon

Pune News : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात शनिवारी (ता. १५) झालेल्या लिलावामध्ये कांद्याला विक्रमी शेकडा ३२६० रुपये भाव मिळाला आहे.

शेतकऱ्यांना जवळच बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे व चांगला भाव मिळाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांनी दर शनिवारी (ता. १५) नीरा येथे भरणाऱ्या लिलावाच्या वेळी आपला कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेली अनेक वर्षे बंद पडलेला नीरा येथील कांदा बाजार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पुन्हा सुरू करण्यात आला आहे. गेल्या वर्षी या बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री झाली होती. यावर्षी देखील आता कांद्याची आवक नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झाली असून नीरा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे.

शनिवारी (ता. १५) नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २१० पिशवी कांद्याची आवक झाली असून दुपारी एक वाजता नीरा बाजार समितीमध्ये लिलाव पार पडले. या वेळी कांद्याला शेकडा ३००० ते ३२५० इतका भाव मिळाला, असल्याची माहिती नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम दगडे यांनी दिली.

कांदा नायलॉनच्या पिशवीत आणू नका

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणताना तो नायलॉनच्या पिशवीमध्ये आणू नये, असे आवाहन केले आहे. त्याऐवजी पारंपरिक सुतळीची नवीन पिशवी कांद्यासाठी वापरावी.

तर सुतळीची पिशवी वापरल्याने कांदा चांगला राहतो त्याची साल निघत नाही. त्यामुळे तो दिसायला चांगला दिसतो. याउलट नायलॉनच्या पिशवीमध्ये कांदा आणल्यास कांद्याची साल निघते त्यामुळे कांदा दिसायला खराब दिसतो परिणामी दरामध्ये फरक पडतो, असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT