Agriculture Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : कांद्यात चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत टोमॅटोचे दर ?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, आले आणि हरभरा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, कांदा बाजार, टोमॅटो दर आंतरराष्ट्रीय बाजारात आज कालच्या तुलनेत सोयाबीनच्या भावात नरमाई आली होती. सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत १०.१७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२२ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता. सोयाबीनचा भाव सध्या ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर प्रक्रिया प्लांट्सनी आपला भाव ४ हजार ८०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान काढला होता. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसामध्ये काहीशी नरमाई

कापसाच्या भावातील चढ उतार कायम आहेत. आंतरराष्ट्रीय  बाजारातील भाव आज कालच्या तुलनेत काहीसे नरमले होते. तर देशात कापसाचा भाव काहीसा स्थिर होता. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत वायदे ७१.४९ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५९ हजार ३१० रुपये प्रतिखंडीवर होते. जागतिक बाजारात सध्या कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतो. तर देशातील कापूस पुढील महिनाभरात बाजारात दाखल होईल. त्यामुळे कापसाच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांद्यात चढ उतार सुरु 

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य काढले आणि निर्यात शुल्क कमी केल्यानंतर कांद्याच्या भावात चांगली सुधारणा झाली होती. पण त्यानंतर कांद्याच्या भावात पुन्हा चढ उतार सुरु झाले. अनेक बाजारात कांद्याचा भाव क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची नरमाई आली होती. आज कांद्याचा सरासरी भाव ४ हजार २०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान अनेक बाजारात होता. कांद्याच्या भावात पुढील काळात चांगली तेजी येऊ शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

गवारला चांगला उठाव

बाजारातील गवारची आवक मागील काही दिवसांपासून चांगलीच कमी झाली आहे. त्यामुळे गवारचा भावही टिकून आहे. मागे राज्याच्या अनेक भागात झालेल्या पावसाचा फटका गवार पिकाला बसला आहे. त्यामुळे बाजारातील आवक घटली आहे. सध्या गवारला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. गवारचा हा भाव पुढील काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.   

टोमॅटोचा भाव स्थिरावला

टोमॅटोच्या भावात चढ उतार सुरु आहेत. टोमॅटोचा भाव मागील दोन दिवसांपासून पुन्हा वाढले आहेत. बाजारातील टोमॅटोची आवक काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे टोमॅटोचा भाव वाढलेला दिसत आहे. वाढलेल्या पावसाचाही टोमॅटोच्या आवकेवर परिणाम दिसत आहे. टोमॅटोचा भाव बहुतांशी बाजारांमध्ये २ हजारांच्या दरम्यान दिसत आहे. सध्या टोमॅटोला सरासरी १ हजार ८ ०० ते २  हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यापुढील काळातही टोमॅटोच्या भावातील चढ उतार कायम राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापारी सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT