Oil and Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Oil Price : तेलाचे दर वाढले, सोयाबीनचे घटले

Market Update : सोयाबीन तेल वापरणाऱ्या ग्राहकांना तेलाच्या वाढीव दराचा सामना करावा लागत आहे. खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केल्यानंतर हे चित्र बाजारात आहे,

Team Agrowon

Amravati News : सोयाबीन तेल वापरणाऱ्या ग्राहकांना तेलाच्या वाढीव दराचा सामना करावा लागत आहे. खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केल्यानंतर हे चित्र बाजारात आहे, तर हमीदर मिळत नसताना उत्पादकता वाढीसाठी व त्यावरील खर्च कमी करण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार काहीच उपाययोजना करीत नसल्याचे वास्तव आहे.

सोयाबीनला हमीदर मिळावा, यासाठी केंद्राने खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ केली आहे. कच्चा खाद्यतेलावरील आयात शुल्क ५.५ टक्क्यांवरून २७.५ टक्के आणि शुद्ध खाद्यतेलावरील आयात शुल्क १३.७५ टक्क्यांवरून ३५.७५ टक्के केले आहे. आयात शुल्कवाढीनंतर खाद्यतेल कंपन्यांनी तातडीने दरवाढ केल्याने किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किमती वाढल्या.

विद्यमान स्थितीत सोयाबीन तेल प्रति लिटर १४५ रुपयांवर आहे. खाद्यतेलाची आयात व पुरवठा सुरळीत असतानाही दरवाढ सहन करण्याची वेळ आली आहे. भविष्यात दर कमी होण्याची शक्यता कमी असल्याचे खाद्यतेल व्यापारी जगदीश साहू यांनी म्हटले आहे.

देशातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असा अंदाज होता. तो आयात शुल्कवाढीनंतर फोल ठरला. याउलट खाद्यतेल कंपन्यांनी तेलाची आयात वाढविली असून त्याचा परिणाम देशी सोयाबीनवर झाला आहे. यंदा देशातील सोयाबीनचे पेरणी क्षेत्र १.२६ लाख हेक्टरने वाढले होते. जागतिक उत्पादनात भारताचा वाटा तीन टक्के आहे. उत्पादकता सर्वांत कमी १० क्विंटल प्रति हेक्टर आहे.

वर्ष २०२३-२४ च्या हंगामात सोयाबीनचे दर हमीदराच्या ४६०० रुपयांच्या खालीच राहिले. यंदा ४८९२ रुपये हमीदर असूनही सरासरी ३९०० रुपये दर मिळत आहे. वर्ष २०२३-२४ च्या हंगामात सोयाबीनचे दर हमीदराच्या ४६०० रुपयांच्या खालीच राहिले. यंदा ४८९२ रुपये हमीदर असूनही सरासरी ३९०० रुपये दर मिळत आहे. शासकीय खरेदी हमीदराने होत असली तरी त्यासाठीच्या अटींमुळे ही खरेदी निर्धारित लक्ष्यांक १४ लाख टनांच्या आसपासही पोहोचू शकली नाही.

बाजारातील चित्र

सोयाबीनचा हमीदर : ४८९२

सोयाबीनचा खुल्या बाजारातील दर : सरासरी ३९०० रुपये

सोयाबीन तेलाचा बाजारातील दर : १४२-१४५ रुपये प्रति किलो

या वर्षी सोयाबीनला ४८९२ रुपये हमीदर आहेत. मात्र बाजारात सोयाबीनला सरासरी ३९०० ते ४१०० रुपये भाव आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च प्रति हेक्टर ४५ हजार रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. हा खर्च कमी करण्यासाठी व उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार काहीच उपाययोजना करायला तयार नाही. उलट खाद्यतेलाची भरमसाट आयात करून भाव पाडत आहे.
राजेश पाटील, खरेदीदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT