Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : मार्केट यार्डमध्येच आता कापसाचे लिलाव

Cotton Procurement : कापूस उत्पादकांना संरक्षण देत वरोरा बाजार समितीने जिनिंगऐवजी बाजार यार्डमध्येच कापसाच्या लिलावाचा निर्णय घेतला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Chandrapur News : कापूस उत्पादकांना संरक्षण देत वरोरा बाजार समितीने जिनिंगऐवजी बाजार यार्डमध्येच कापसाच्या लिलावाचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (ता. २१) पहिल्यांदा बाजार समिती यार्डमध्येच कापसाचे लिलाव करण्यात आले. या वेळी मुहूर्ताला ७०३१ रुपयांचा दर मिळाला.

वरोरा बाजार समितीअंतर्गत कापसाचे लागवड क्षेत्र मोठे आहे. त्यासोबतच या भागात नजीकच्या काळात कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग, जिनिंग प्रेसिंगची संख्याही वाढीस लागली आहे. तब्बल दहा जिनिंग या बाजार समितीच्या हद्दीत आहेत. या जिनर्सनी कापसाच्या खरेदीकरिता बाजार परवाना घेतला आहे. त्या माध्यमातून थेट जिनिंग परिसरात खरेदी होत होती.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यंदाच्या हंगामापासून मात्र बाजार यार्डावरच शेतकऱ्यांनी कापूस आणावा त्यानंतर त्याचा यार्डावरच लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी (ता. २१) खरेदीचा प्रारंभ करण्यात आला.

मुहूर्ताच्या कापसाला ७०३१ रुपयांच दर मिळाला. या वेळी बाजार समिती सभापती डॉ. विजय देवतळे, उपसभापती जयंत टेमुर्डे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. बाजार समितीचे संचालक बाळू भोयर, दत्ता बोरेकर, प्रवीण मालू, सचिव चंद्रसेन शिंदे, केंद्रप्रमुख सचिन डहालकर व कर्मचारी उपस्थित होते.

वरोरा येथील मुख्य मार्केट यार्ड, खांबाडा, शेगाव, माढेळी या उपबाजारातदेखील कापसाच्या खुल्या लिलाव प्रक्रियेला प्रोत्साहन देत शेतकऱ्यांना जास्त दर मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कापूस खरेदी केल्यानंतर हिशेब पट्टी तयार करून कापसाचे पेमेंट शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात किंवा नगदी तत्काळ खरेदीदार किंवा व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. या व्यवहारात अडत्याचे कमिशन नाही.

बाजार समिती हद्दीत १० जिनिंग आहेत. आता जिनिंग परिसराऐवजी मार्केट यार्डमध्येच कापसाचे खुले लिलाव होतील. त्यामुळे स्पर्धा वाढून शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळण्यास मदत होणार आहे.
- चंद्रसेन शिंदे, सचिव, बाजार समिती, वरोरा, चंद्रपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT