Nampur APMC Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Nampur APMC : नामपूर बाजार समिती दहा दिवस बंद

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर येथील बाजार समिती आवारातील कांदा व भुसार मालाचे लिलाव २१ ऑक्टोबरपासून ३१ तारखेपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प होणार आहे.

टीम ॲग्रोवन

जि. नाशिक : दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर येथील बाजार समिती आवारातील कांदा व भुसार मालाचे लिलाव २१ ऑक्टोबरपासून ३१ तारखेपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प होणार आहे. आर्थिक टंचाई, मंजूर टंचाई, कांदा व्यापाऱ्यांचा विनंती अर्ज आदी बाबींमुळे कांदा खरेदी मार्केट बंद (Onion Market Closed) राहील. दरम्यान, बाजार समित्या (APMC) तीन दिवस बंद न ठेवण्याच्या जिल्हा निबंधकांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचा आरोप होत आहे.

उन्हाळ कांद्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक वाढ झाल्याने येथील बाजार समिती आवारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. नामपूर कांदा व्यापारी असोसिएशनच्या मागणीनुसार दहा दिवस कांदा मार्केट बंद राहणार आहे.

तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस मार्केट बंद करू नये, असे आदेश जिल्हा निबंधक डॉ. सतीश खरे यांनी दिले असले तरी नामपूरसह जिल्ह्यातील अनेक बाजार समित्या बंद राहणार असल्याने बाजार समित्यांनी जिल्हा निबंधकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. ऐन दरवाढीच्या काळात कांदा खरेदी बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसात येथील कांदा मार्केटमध्ये कांद्याचे सरासरी दर दोन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचल्याने येथे आवक वाढली आहे.

परंतु, कांदा व्यापाऱ्यांच्या शेडवर दिवाळीमुळे मजूर उपलब्ध नसल्याने कांदा मार्केट बंद राहणार आहे. बाजार समितीच्या निर्णयाबाबत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

Chief Secretary Review: नोंदणी, मुद्रांक विभागाचा मुख्य सचिवांकडून आढावा

Ajit Pawar Condolence Meeting: दादांच्या योगदानाबाबत बारामतीत कृतज्ञता व्यक्त

Natural Farming: नैसर्गिक शेतीसाठी साधन निर्मिती गरजेची: डॉ. नारनवरे

Union Budget Agri: शेतकऱ्यांना ‘नारळ’

SCROLL FOR NEXT