Abdul sattar Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Nafed Chana procurement : राज्यात नाफेडची हरभरा खरेदी आजपासून सुरू : कृषिमंत्री सत्तार

सत्तार म्हणाले, नाफेडची ५१० हरभरा खरेदी केंद्र मंगळवार (ता.१४) पासून सुरू करण्यात आली आहेत.

Team Agrowon

Chana Market : राज्यात मंगळवारपासून (ता.१४) नाफेडची हरभरा खरेदी सुरू झाली आहे,

अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत दिली.

विरोधीपक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर सत्तार बोलत होते.

केंद्र सरकारला खरेदीचे उद्दिष्ट गाठवण्यासाठी हरभरा खरेदी सुरू केली आहे.

त्यासाठी २ लाख १७ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन खरेदी केल्याचे सत्तारांनी सांगितले.

सत्तार म्हणाले, "नाफेडची ५१० हरभरा खरेदी केंद्र मंगळवार (ता.१४) पासून सुरू करण्यात आली आहेत.

नाफेड यंदा ५५२ खरेदी केंद्राला मान्यता दिली आहे.

२७ फेब्रुवारीपासून नाफेडने हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली होती.

त्यामध्ये राज्यातील २ लाख १७ हजार १५६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली."

"राज्यात यंदा हरभरा लागवड गेल्यावर्षीच्या तुलनेत ५ लाख हेक्टरने वाढली आहे. त्यामुळे यंदा १० लाख मेट्रिक टन वाढ अपेक्षित आहे.

तसेच केंद्र सरकारने २०२२-२३ साठी ८८ लाख मेट्रिक टन खरेदी खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे," अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत दिली.

दरम्यान, राज्यातील बाजारात हरभऱ्याचे दर हमीभावाच्या खाली आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांचे नाफेडच्या हरभरा खरेदी लक्ष लागून आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loose Edible Oil Ban: सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी, नियम मोडल्यास कारवाई, तुकाराम मुंढेंचा इशारा

Kadva Sugar Factory : कादवा कारखान्याकडून प्रतिटन ३ हजार रुपये ऊस बिल वर्ग

Eco Tourism : ‘इको-टुरिझम संवर्धन विकास आराखडा’

Modern Agriculture Technology : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवा : तरंगे

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ३ हजारांवर मतदार

SCROLL FOR NEXT