Maize Import Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Import : मेक्सिको जीएम मक्याची आयात बंद करणार

जगात मका आयात करणारा मेक्सिको महत्वाचा देश आहे. अमेरिकेच्या मक्याचा मक्सिको मोठा ग्राहक आहे. मेक्सिको दरवर्षी अमेरिकेतून जवळपास १७० लाख टन मका आयात करतो.

टीम ॲग्रोवन

पुणेः मेक्सिकोने जीएम मक्याच्या आयातीवर (GM Maize Import) बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मात्र मेक्सिको मक्यासाठी आयातीवर (Maize Import) अवलंबून असल्याने बंदीची वाट बिकट आहे. पण मेक्सिकोच्या कृषीमंत्र्यांनी आपण बंदीच्या निर्णयावर कायम असून, नाॅन जीएम मक्याच्या (Non GM Maize) उपलब्धतेचे पर्यायही तयार असल्याचे सांगितले.

जगात मका आयात करणारा मेक्सिको महत्वाचा देश आहे. अमेरिकेच्या मक्याचा मक्सिको मोठा ग्राहक आहे. मेक्सिको दरवर्षी अमेरिकेतून जवळपास १७० लाख टन मका आयात करतो. मात्र मेक्सिकोने २०२४ पासून जणुकीय सुधारित म्हणजेच जीएम मका आयात बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मेक्सिकोला मक्याची टंचाई भासण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र त्यावर तोडगा काढल्याचे मेक्सिकोचे कृषी मंत्रालयाचे उपमंत्री व्हिक्टर सुआरेज यांनी सांगितले.

अमेरिकेतून आयात होणारा जीएम मका मुख्यतः पशुखाद्यात वापरला जातो. मंत्री सुआरेज यांनी सांगितले, की मेक्सिको आपल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करून देशातच मका उत्पादन वाढविण्यावर भर देणार आहे. तसेच अमेरिका, अर्जेंटीना आणि ब्राझीलमधील शेतकऱ्यांसोबत नाॅन जीएम मका उत्पादन आणि पुरवठ्यासाठी करार करण्यात येणार आहेत. तसेच अमेरिकेतून नाॅन जीएम मका आयातीचे इतरही पर्याय उपलब्ध आहेत, असंही सुआरेज यांनी सांगितले.

मेक्सिकोने यापुर्वीच जीएम मका आयातीवर बंदी आणण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र मेक्सिको मक्यासाठी आयातीवर अवलंबून आहे. त्यातही अमेरिका मुख्य मका पुरवठादार आहे. शेजारच्या देशांमध्येही नाॅन जीएम मक्याचं उत्पादन खूपच कमी होते. त्यामुळे मेक्सिको बंदीचा निर्णय मागे घेईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र उपमंत्री सुआरेज यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर मेक्सिको बंदी मागे घेणार नाही, हे जवळपास स्पष्ट झाले. मेक्सिकोच्या या निर्णयामुळे नाॅन जीएम मका उत्पादन घेणाऱ्या देशांनाही संधी निर्माण होऊ शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT