Futures Rate
Futures Rate Agrowon
मार्केट ट्रेंड

प्रमुख पिकांच्या किमतींत उतरता कल

डॉ. अरुण प्र. कुलकर्णी

एप्रिल महिन्यात कापसाच्या किमती वाढत होत्या. मका, हळद, हरभरा, तूर, मूग व सोयाबीन यांच्या किमती उतरत होत्या. कांद्याच्या किमतीसुद्धा उतरता कल दाखवत होत्या. देशात कापूस, मका, हळद, मूग यांची आवक कमी होत आहे. हरभरा व कांदा यांची आवक वाढत आहे. कापसाची आवक घटली आहे. मुगाची आवक पण कमी होत असून ती सध्या पाच हजार टनाच्या आसपास आहे. सोयाबीनची आवक कमी होत होती; पण गेल्या दोन-तीन आठवड्यांत ती वाढू लागली आहे. तीच स्थिती तुरीची आहे. टोमॅटोची आवक आता कमी होत आहे.

सोयापेंडीच्या किमती वाढल्यामुळे पशुखाद्य व्यवसाय अडचणीत आहे. त्यावर उपाय म्हणून गेल्या सप्ताहात शासनाने सोयापेंड आयातीची मुदत वाढवण्यास परवानगी दिली. सोयातेलसुद्धा आता ब्राझील मधून येत आहे. याचा परिणाम सोयबीनच्या किमती उतरण्यावर होत आहे. सोयाबीनच्या किमती आता वाढण्याची शक्यता कमी झाल्यामुळे पुढील काही दिवसांत सोयाबीनचा साठा बाजारात येण्याची शक्यता आहे.

अजूनही सोयाबीन, तूर, हरभरा व मूग यांचे फ्युचर्स व्यवहार करायला परवानगी नाही. या सप्ताहात कापूस व मका यांच्या किमती वाढल्या. टोमॅटोच्या किमतीसुद्धा आता वाढू लागल्या आहेत. इतर शेतीमालाच्या किमती घसरल्या. कांद्याच्या किमतींवर लक्ष ठेवणे जरूर आहे. २ मे पासून NCDEX मध्ये बाजरी, मका व हळद यांचे सप्टेंबर फ्युचर्ससाठी तर MCX मध्ये कापसासाठी ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर फ्युचर्ससाठी व्यवहार सुरु होतील.

सप्ताहातील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) एप्रिल महिन्यात वाढत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव १.७ टक्क्यांनी वाढून रु. ४५,९४० वर आले होते. या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव पुन्हा १ टक्क्याने वाढून रु. ४६,४०० वर आले आहेत. जून डिलिवरी भाव १.४ टक्क्यांनी वाढून रु. ४६,३६० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव ०.९ टक्क्यांनी वाढून रु २,३०२ वर आले आहेत. कापसातील तेजी कायम राहील.

मका

मक्याच्या स्पॉट (गुलाबबाग) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात मात्र त्या २.३ टक्क्यांनी वाढून रु. २,२१० वर आल्या आहेत. फ्युचर्स (जून डिलिवरी) किमती रु. २,२२२ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्युचर्स किमती रु. २,००८ वर आल्या आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,८७० आहे. मक्याची मागणी वाढती राहणार आहे. मक्याचा इथेनॉलसाठी वापर, युक्रेन युद्ध व खताच्या वाढत्या किमती यामुळे मक्याच्या जागतिक किमतीसुद्धा वाढत आहेत.

हळद

हळदीच्या स्पॉट (निझामाबाद) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी घसरून रु. ८,५८२ वर आल्या आहेत. जून फ्युचर्स किमती ३.७ टक्क्यांनी घसरून रु. ८,३१४ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती एप्रिलमध्ये उतरत होत्या. या सप्ताहात त्या रु. ४,९२६ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,२३० आहे. आवक वाढत आहे.

मूग

मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ६,९०० होती; या सप्ताहात ती ६,८०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,२७५ आहे. आवक आता कमी होत आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) एप्रिल महिन्यात उतरत होती. गेल्या सप्ताहात ती १.६ टक्क्यांनी घसरून रु. ७,६४८ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा २.७ टक्क्यांनी घसरून रु. ७,४४४ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ३,९५० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) एप्रिल महिन्यात कमी होत होती. गेल्या सप्ताहात ती रु. ६,०८३ वर आली होती. या सप्ताहात ती १.७ टक्क्यांनी घसरून रु. ५,९८० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,३०० आहे. तुरीची आवक कमी होऊ लागली आहे.

कांदा

कांद्याची स्पॉट किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. ८८९ होती; या सप्ताहात ती रु. ८८७ वर आली आहे. रबी कांद्याची आवक आता वाढू लागली आहे.

टोमॅटो

टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) ३० एप्रिल रोजी रु. १,५०० होती; त्यानंतर ती वाढत सप्ताहाच्या अखेरीस रु. २,५०० पर्यंत आली आहे. टोमॅटोची आवक आता कमी होऊ लागली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electric Tractor : इलेक्ट्रिक ट्रॅक्टर जरूर आणा, पण...

Animal Ear Tagging : मे अखेरपर्यंत करावी जनावरांची इअर टॅगिंग

Mahavitran Chatbot Service : ‘महावितरण’ची ग्राहकांसाठी २४ तास ‘चॅटबॉट’ सेवा

Tomato Cultivation : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात टोमॅटो लागवडीला वेग

Turmeric Seed : छत्तीसगडला ‘एमपीकेव्ही’च्या हळद बियाण्याची भुरळ

SCROLL FOR NEXT