Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापूस बाजारभाव, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर ?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, हरभरा आणि केळी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये काहीशी वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन दरावरील दबाव कायम आहे. पण आठवड्याच्या शेवटी सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली. शुक्रवारी सोयाबीनचे वायदे ९.५२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. तर सोयातेलाचा बाजार ४०.३८ सेंट प्रतिपाऊंवर होता. सोयापेंडचा भाव ३०४ डाॅलर प्रतिटनांवर होता. देशातही सोयाबीन दरात काहीशी वाढ झाली होती. पण प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीचा भाव ५० रुपयांनी वाढवला होता. ४५०० ते ४५५० रुपयांच्या दरम्यान खरेदी सुरु होती. तर बाजार समित्यांमध्ये भाव सरासरी ४ हजार ते ४ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापूस काहीसा सुधारला

आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातही कापसाच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती. कापसाला उठाव मिळत असल्याने दराला काहीसा आधार मिळाल्याचे सांगितले जाते. अनेक दिवसानंतर कापसाचे वायदे शुक्रवारी ७०.९१ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५७ हजार ७०० रुपये प्रतिखंडीवर पोचले होते. तर बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र कायम दिसली. बाजार समित्यांमधील भाव ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारात पुढच्या काळात सुधारणेचे संकेत दिसत आहेत, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांद्यात चढ उतार

कांदा बाजारात सध्या काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. घटलेल्या दरात मागणी वाढल्यानंतर बाजारातील आवक कमी होत आहे. तर दरात वाढ झाल्यानंतर मागणी कमी होऊन दरात काहीशी नरमाई दिसत आहे. हे समिकरण आजही बाजारात दिसून आले. कांद्याच्या भावात काही बाजारांमध्ये क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची नरमाई दिसून आली. आज कांद्याला सरासरी २ हजार ८०० ते ३ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला. बाजारातील हे चढ उतार आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

हरभऱ्यातील तेजी कायम 

हरभऱ्याच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये चांगली सुधारणा झाली. देशात यंदा हरभरा उत्पादन घटले आहे. पण मागणी कायम आहे. इतर कडधान्याचे भावही टिकून आहेत. याचा आधार हरभऱ्याला मिळत आहे. सणांच्या पार्श्वभुमीवर हरभऱ्याला उठाव मिळत आहे. परिणामी हरभरा भाव प्रतिक्विंटल ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान पोचला आहे. बाजारातील आवक सध्या कमी झालेली आहे. सणांमुळे हरभरा भावाला पुढील काही महीने आधार मिळेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.   

केळीचा बाजार कायम

श्रावण महिन्यांतील उपवासामुळे केळीला सध्या चांगला उठाव मिळत आहे. तर बाजारातील केळीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. त्यातच सध्या बाजारात गुणवत्तापूर्ण केळीची टंचाई भासत आहे. त्यामुळे केळीचे भाव काहीसे सुधारले आहेत. सध्या केळीला सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. केळीला यापुढे श्रावण, गणपती आणि नवरात्रीत चांगला उठाव राहणार आहे. त्यामुळे केळीचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT