Onion Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांद्याच्या बाजारात आज काय घडामोडी घडल्या ?

Market Update : सरकारने बांगलादेश आणि युएईला कांदा निर्यातीची परवानगी दिल्याने बाजाराला काहीसा आधार मिळाला आहे.

Anil Jadhao 

Market Bulletin : सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावावरील दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती. तर देशात भावपातळी कायम आहे. देशातील बाजारातील सरासरी दरपातळी आज ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते.

बाजारातील आवकही टिकून आहे. तसेच मागणी मंदावलेली आहे. त्यामुळे सोयाबीन बाजारावरील दबाव कायम दिसतो. आणखी काही दिवस सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या भावात मागील चार दिवसांपासून काहीसे चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे आणि प्रत्यक्ष खरेदी भाव कालच्या तुलनेत काहीसे वाढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात मागील चार दिवसांमध्ये भाव कमी झाले तरी देशातील भावापेक्षा जास्तच आहेत. तर देशातील कापूस आवक खूपच घटली आहे.

काल देशात ८४ हजार गाठी कापसाची आवक झाली होती. तर सरासरी भावपातळी ७ हजार २०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती. देशातील बाजारात कापसाचे भाव तेजीतच राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांद्याचे भाव देशातील बाजारात स्थिरावले आहेत. दुसरीकडे आवकही स्थिर आहे. काही बाजारांमध्ये आता उन्हाळ कांद्याची आवक वाढत आहे. सरकारने बांगलादेश आणि युएईला कांदा निर्यातीची परवानगी दिल्याने बाजाराला काहीसा आधार मिळाला आहे.

कांद्याची सरासरी भावपातळी आज १४०० ते १७०० रुपयांचा भाव मिळाला. तर बाजारातील आवक स्थिर होती. कांदा बाजारातील आवक मार्च महिन्यात मर्यादीत होण्याची शक्यताही काही अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

देशातील बाजारात तुरीचे भाव टिकून आहेत. दुसरीकडे तुरीची बाजारातील आवक कमीच आहे. सरकार आयात वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. पण आयातीवर देखील मर्यादा दिसून येत आहे. परिणामी तुरीचे भाव ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान टिकून आहेत.

यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव जाणवण्याची शक्यता खूपच आहे. यामुळे तुरीचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

टोमॅटोचे भाव देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून टिकून आहेत. टोमॅटोचे भाव मागील मागील काही आठवड्यांपासून काहीसे वाढत आहेत. सध्या बाजारात टोमॅटोला सरासरी १ हजार ८०० ते २ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

तर बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. सध्या काही भागात पिकाला पाण्याची टंचाई जाणवत आहे. तर सध्या तोडा सुरु असलेले प्लाॅटही कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे टोमॅटोच्या भावातील वाढ कायम राहील, असाही अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT