Onion Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांद्याची बाजारातील आवक कशामुळे वाढली?

Anil Jadhao 

Market Bulletin : सोयाबीनच आणि सोयापेंड बाजारातील चढ उतार सुरुच आहेत. सोयाबीनचे वायदे कालच्या तुलनेत आज काहीसे कमी होऊन १३.१४ डाॅलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान होते. तर सोयापेंडने पुन्हा एकदा ४०० डाॅलरची पातळी गाठली होती. सोयापेंडच्या वायद्यांमध्येही मोठे चढ उतार सुरु आहेत.

देशातील बाजारातही गेल्या दोन आठवड्यापासून सोयाबीनचे भाव दबावात आहेत. सोयाबीनला आजही सरासरी ४ हजार ६०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजाराचा दबाव देशातील बाजारावरही दिसून आला. ही परिस्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज आहे.

देशातील बाजारात कापसाचे भाव दबावातच आहेत. बाजारातील कापूस आवक मात्र टिकून आहे. दैनंदीन सरासरी आवक सव्वालाख गाठींच्या दरम्यान असल्याचे व्यापारी सांगतात. तर कापूस, सूत आणि कापडाला उठाव नसल्याचे उद्योगांडून सांगण्यात येते. अशा कात्रित सध्या कापूस बाजार अडकल्याचे दिसते.

सध्या कापसाला सरासरी ६ हजार ६०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस स्थिर दिसतो. तर बाजारातील आवक आणखी एक ते दीड महिना दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

कांदा उत्पादनात २५ टक्के घट होण्याचा अंदाज असल्याने सरकारने निर्यातबंदी केल्याचे म्हटले आहे. पण निर्यातबंदीने सध्या बाजार मोठ्या प्रमाणात कोलमडला. कांद्याचे भाव अनेक बाजारांमध्ये आता निम्म्यावर आलेले आहेत. तर बाजारातील आवक वाढलेली दिसते. त्यामुळे कांदा उत्पादनाबाबत सरकारचा अंदाज चुकल्याचे सांगितले जाते. पण आवक वाढल्याचा दबावही दरावर येत आहे.

सध्या बाजारात कांदा १ हजार ७०० ते २ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. मागील आठवडाभर कांदा बाजार कोसळल्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. बाजारातील आवकेचा दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सरकारने गहू साठा मर्यादा कमी केल्याचा बाजारावर परिणाम दिसून येत आहे. साठा मर्यादा कमी केल्यामुळे व्यापारी आणि विक्री संस्थांना या मर्यादेच्या पुढे गव्हाचा स्टाॅक ठेवता येत नाही. म्हणजेच व्यापाऱ्यांना या मर्यादेतच व्यापार करावा लागेल. सहाजिकच याचा परिणाम भावावर दिसून येत आहे.

गव्हाचे भाव जवळपास १०० रुपयाने नरमले आहेत. भारतीय अन्न महामंडळ म्हणजे एफसीआयच्या लिलावातही भाव कमी झाला होता. गव्हाचा भाव सध्या २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान होता. आता गहू बाजाराचे लक्ष रब्बी हंगामातील गहू लागवड आणि उत्पादनावर आहे, असे गहू बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

देशातील बाजारात बाजरीचे भाव टिकून आहेत. खरिपात यंदा बाजरीच्या उत्पादकतेला फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे बाजारातील आवकही सरासरीपेक्षा कमी आहे. तर बाजरीला सध्या उठाव चांगला आहे.

परिणामी बाजारीचा भाव टिकून आहे. बाजरीला सरासरी २ हजार ४०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. रब्बीतही बाजरी उत्पादन वाढीची शक्यता फारशी नाही. त्यामुळे पुढील काळातही बाजारीचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Warehouse : गोदामाच्या रचनेनुसार उंचीचे नियोजन

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

SCROLL FOR NEXT