Market Bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : तुरीचा बाजारभाव टिकून

Market Bulletin: सरकारने तुरीवरील स्टाॅक लिमिटचा कालावधी वाढवला आणि स्टाॅकची मर्यादाही कमी केली. तसेच देशातील काही भागात पाऊस पडत आहे. यामुळे पिकाला फायदा होत असल्याचे सांगितले जात आहे

Anil Jadhao 

1. कापसाच्या वायद्यांमध्ये आज संमिश्र स्थिती होती. देशातील कापूस वायदे आज दुपारपर्यंत काहीसे वाढून ६१ हजारांवर पोचले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज काहीसे नरमले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायदे ८७.१३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. बाजार समित्यांमधील भाव मात्र आजही कायम होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थिती दरवाढीला पुरक आहे. त्यामुळे पुढील काळात कापसाच्या दरात सुधारणा अपेक्षित आहे, असे जाणकारांनी सांगितले.  

2. देशात सोयाबीनचे भाव एकाच पातळीवर स्थिर आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये दोन टक्क्यांची नरमाई येऊन १२.७५ डाॅलरवर वायदे आले होते. तर सोयापेंडच्या वायद्यांमध्ये जवळपास दोन टक्क्यांनी घड झाली होती. सोयापेंडचे वायदे ३८१ डाॅलर प्रतिटनांवर आले होते. सोयातेलाच्या भावातही काहीशी नरमाई आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनमध्ये चढ उतार सुरु असले तरी देशातील भाव आणखी काही दिवस स्थिर दिसू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

3. केळीला चांगला उठाव आहे. त्यामुळे दरही टिकून होते. पुढील काळातही केळीला उठाव चांगला राहण्याची शक्यता आहे. परिणामी केळीचे भाव पुढील काळातही टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. सध्या केळीला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील काही दिवसांमध्ये केळीचे भाव आणखी काहीसे सुधारु शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

4. बाजारातील गवारचे भाव टिकून आहेत. बाजारातील गवारची आवक कमीच आहे. पण गवारला चांगला उठाव आहे. यामुळे गवारचे भाव तेजीत आहेत. सध्या गवारला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. यापुढील काळातही बाजारातील गवारची आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे गवारच्या भावातील तेजीत टिकून राहू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

5. देशात तुरीच्या भावातील तेजी कायम आहे. बाजारातील तुरीची आवक कमीच आहे. तुरीला बाजारात चांगलाच उठाव मिळत आहे. याचा तुरीला आधार मिळतोय. आतापर्यंत देशातील तुरीची लागवड जवळपास ४४ लाख हेक्टरवर पोचल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. आतापर्यंतची लागवड गेल्यावर्षीपेक्षा जवळपास ६ टक्क्यांनी कमी आहे. पण उद्योग आणि व्यापाऱ्यांच्या मते तुरीची लागवड सरकारच्या अंदाजापेक्षा जास्त प्रमाणात घटली आहे. त्यातच यंदा आधी देशात दुष्काळी स्थिती आणि आता पावसामुळे पिकाला फटका बसत आहे. याचा फटका तूर पिकाला बसत आहे. देशातील एकूण लागवडीपैकी तब्बल ६५ ते ७० टक्के क्षेत्र महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्येच आहे. पण या दोन्ही राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. पण ऐन वाढीच्या काळात पाण्याचा ताण बसल्याने पिकाला मोठा फटका बसला. चालू हंगामातही तुरीचे उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज आहे. सरकारने तूर आणि उडदावरील स्टाॅक लिमिटचा कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवला. तर स्टाॅक लिमिटची मर्यादाही कमी केली. पण याचा दरावर फारसा परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे, असे जाणकारांनी सांगितले. सध्या तुरीला बाजारात ११ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तुरीच्या दरातील तेजी पुढील काळातही टिकून राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT