Market Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : टोमॅटो पोचला ४ हजारांवर; कापूस, सोयाबीन, हरभरा तसेच काय आहेत आले दर ?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, हरभरा आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत ११.५३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२७ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली आहे. मात्र स्वस्त तेलाची आय़ात आणि सोयापेंडचे पडलेले भाव यामुळे देशातही सोयाबीन दबावातच आहे. सोयाबीनला सध्या सरासरी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या वायद्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढ उतार सुरु आहेत. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत ७१.१७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५८ हजार २० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमध्येही कापसाच्या भावात काहीशी नरमाई आली आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

टोमॅटोच्या भावातील तेजी कायम आहे. बाजारातील टोमॅटोची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. तर दुसरीकडे टोमॅटोला उठाव चांगला आहे. पावसाचाही टोमॅटो पिकावर आणि बाजारातील आवकेवर परिणाम होत आहे. त्यामुळे टोमॅटोचा बाजार सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापारी सांगत आहेत. 

हरभरा बाजारात काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. पण सरासरी दरपातळी टिकून असल्याचे दिसते. बहुतांशी बाजारांमध्ये आवकही कमी झाली आहे. सध्या शेतकऱ्यांकडे हरभरा कमी प्रमाणात आहे. परिणामी मर्यादीत अवकेमुळे दराला आधार दिसत आहे. त्यामुळे हरभरा भाव आजही ६ हजार ते ६ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. हरभऱ्याची मागणी चांगली राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आणखी काही महीने हरभरा भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकंनी व्यक्त केला. 

मागील वर्षभर आल्याला चांगला भाव मिळाला. त्यामुळे नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली. याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळत आहे. आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत. बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव सरासरी भावापातळी सध्या ६ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT